Ahilyanagar commendable initiative creating waterholes inside forest for Wild animals who search of water : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. मनुष्यांप्रमाणेच आता मुक्या जनावरांना देखील पाण्यासाठी मानवी वस्तीकडे वाटचाल करावी लागत आहे. पाण्याअभावी जंगलातील वन्यजीवांची अवस्थाही अधिकच बिकट झाली आहे. वन्यजीवांची मानवी वस्तीकडे वाटचाल होऊ नये व जंगलातच त्यांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी थेट जंगलातच पाणवठे सुरु करत एक समाजिक संदेश देण्यात आला.
Eetha:श्रद्धा कपूरच्या गाण्यावर झाले सगळेच फिदा; ‘ईठा’ मधील ‘जी जी रे जी’ गाण्याला नादखुळा पसंती!
पारनेर तालुक्यातील कामरगाव येथे वनविभागाच्या जवळपास 300 हेक्टर परिसरात वन्यजीवांसाठी 6 पाणवठे तयार करण्यात आले आहे. तसेच या सर्व पाणवठ्यांमध्ये जळपास 20 ते 25 हजार लिटर पाणी हे दर आठवड्याला सोडण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या काळात वन्यजीवांचा शिरकाव हा मानवी वस्तीमध्ये होऊ नये तसेच वन्यजीवांना देखील पाण्यासाठी वणवण फिरावं लागावं नाही यासाठी लोकसहभागातून आणखी पाणवठे सुरु करणार असल्याची माहिती समाजसेवक सिद्धांत आंधळे यांनी दिली.
पाण्याअभावी बिबटे रस्त्यावर
अहिल्यानगर जिल्ह्यात अनके ठिकाणी बिबट्याचे मानवी वस्तीमध्ये हालचाल हि आढळून आली. विशेष म्हणजे पाण्यासाठी व भक्षकासाठी बिबट्या थेट आता नगर शहरात दाखल झाला आहे. नगर शहरातील सावेडी उपनगर, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा संचार दिसून आला आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घेतली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष… ग्रामस्थांचा आरोप
बिबट्या, हरीण, काळवीट, सांबर, रानडुक्कर आणि विविध पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वन विभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र यंदा जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे व यातच पारनेर परिसरात प्राण्यांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील पाणवठे सुरु करण्यात आले नसल्याची तक्रारनागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात तातडीने पाणवठे सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून तसेच गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
