Police Arrest Shiv Sena Thackeray Group Leader Kiran Kale : अहिल्यानगरमधून शिवसेना (Shiv Sena) (ठाकरे गट) साठी एक मोठी अडचण समोर आली आहे. पक्षाचे नगर शहरप्रमुख किरण काळे यांना (Thackeray Group Leader Kiran Kale) बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कोतवाली पोलीस ठाण्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ( Ahilyanagar Crime) सोमवारी रात्री पोलिसांनी किरण काळे यांना ताब्यात घेतलं.
किरण काळेंवर गंभीर आरोप
तक्रारदार महिलेने पोलिसांकडे दिलेल्या माहितीप्रमाणे, ती आणि तिच्या पतीमध्ये अनेक दिवसांपासून वाद आणि तणाव सुरू होता. या वादात मध्यस्थी करण्याच्या निमित्ताने किरण काळे तिच्या संपर्कात आले, आणि हळूहळू त्यांच्या ओळखीचा फायदा घेत त्यांनी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
धनखड यांचा राजीनामा, राज्यसभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे आता कोणाकडे? नवा उपराष्ट्रपती कसे निवडणार?
पीडित महिलेच्या म्हणण्यांनुसार 2023 ते 2024 या कालावधीत शहरप्रमुख काळे यांनी आपल्या कार्यालयात तिच्यावर वारंवार अत्याचार केला. इतकंच नाही, तर ही माहिती इतरांना कळू नये म्हणून जीवे मारण्याची धमकीही दिली, असं तक्रारीत नमूद आहे. तक्रार दिल्यानंतर पीडित महिलेने विष घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या वैद्यकीय देखरेखेत उपचार सुरू आहेत.
राजकीय भूकंपाची शक्यता
या प्रकरणामुळे नगर शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. किरण काळे हे शिवसेना ठाकरे गटातील एक सक्रिय आणि प्रभावी स्थानिक नेता मानले जात होते. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक नेतृत्वासाठी ही मोठी अडचण निर्माण झाली असून, विरोधकांनीही या प्रकरणावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे.
महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; आज ५५ वा वाढदिवस, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास
काही दिवसांपूर्वीच नगर शहरातील रस्ते विकास प्रकल्पांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात किरण काळे यांनी काही माहिती प्रसिद्ध केली होती. त्यांच्या या वक्तव्यांनंतर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर किरण काळे अचानक चर्चेत आले होते. मात्र, आता त्यांच्याविरोधात आलेल्या गंभीर आरोपांमुळे परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे.