Prajakt Tanpure : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून राहुरीतून विधानपरिषदेचे सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी बाजी मारली आहे. तर सत्यजीत कदम यांचा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे शेती पूरक मधून आमदार आशुतोष काळे विजयी झाले आहे तर सुधीर म्हस्के यांचा पराभव झाला आहे.
राहुरीमधून विद्यमान आमदार प्राजक्ता तनपुरे (Prajakt Tanpure) यांना 89 मते विजय तर प्रतिस्पर्धी सत्यजित कदम यांना 18 मते मिळाली. तर दुसरीकडे अकोलेमधून आमदार आमदार किरण लहामटे मोठा धक्का बसला आहे. अकोलेमधून संजीवनी शिंदे यांना 49 मते मिळाली आहे तर किरण लहामटे यांना 36 मते मिळाली आहे. तर दुसरीकडे कर्जत येथे राम शिंदे यांच्या उमेदवार ज्योती शिंदे देखील विजयी झाल्या आहेत. त्यांना या निवडणुकीत 54 मते मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवार पिसाळ यांना अवघी वीस मते मिळाली आहे.
खासदार लंके विजय
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Ahilyanagar District Bank Election) पारनेरच्या (Parner) प्रतिष्ठेच्या लढतीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून लंके यांनी एकूण 104 मतदानांपैकी 64 मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विखे समर्थक मानले जाणारे भाजपचे राहुल शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालाने जिल्हा बँकेच्या राजकारणात लंके यांनी दमदार प्रवेश केला असून विखे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणूक; अटीतटीच्या लढतीमध्ये पालकमंत्री शुंभूराज देसाई विजयी
