Maharashtra Kesri : अहिल्यानगर शहरामध्ये बुधवारपासून म्हणजेच २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Wrestling Tournament) थरार सुरू झाला असून कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आलीयं. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी अहिल्यानगरच्या मातीत तब्बल 900 मल्ल मैदान गाजवणार आहेत.
मुंडेंना नडणाऱ्या धसांना अजितदादांचा धक्का; आमदार असूनही नियोजन समितीतून डच्चू
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार अरुण जगताप, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप, हिंदकेसरी योगेश दोडके, कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक भैय्या गंधे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक निखिल वारे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
निरगुडी व वडगाव शिंदे येथे वन उद्यान उभारा; अजितदादांकडे बापूसाहेब पठारे यांची मागणी
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र केसरी विजेत्याला राज्य किंवा केंद्र शासन शासकीय नोकरीत तसेच उपमहाराष्ट्र केसरी व तृतीय क्रमांकावर राहिलेल्या मल्लाला देखील शासनाने शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केलीयं. तर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कुस्ती ही अनादी काळापासून सुरू असलेला एकमेव खेळ आहे. कुस्तीला अनेक वर्षांची मोठी परंपरा असून कुस्तीच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार झाले आहेत. ग्रामीण भागात आजही कुस्त्यांचा हगामा भरवला जातो. त्यातून कुस्त्यांची नाळ ही आंतरराष्ट्रीय स्तरापासून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत जोडलेली असल्याचे पहायला मिळते, असे यावेळी त्यांनी सांगितले.