Ahilyanagar Police : अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील श्री महालक्ष्मी माता मंदिरात (Shri Mahalaxmi Mata Mandir) चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Ahilyanagar Police) पथकाने अटक केली केली आहे. आरोपीकडून देवीच्या मुर्तीचे चांदीचे टोप, चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागीने असा एकूण 24,94,000 रुपये किमतीचे दागिने आणि ऐवज जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दवंगे याने कुंदेवाडी (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रस्त्यावरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची माहिती सांगितली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे या प्रकरणी पोलिसांनी सुयोग दवंगे, संदीप साबळे, संदीप गोडे, अनिकेत कदम, दिपक पाटेकर, सचिन मंडलीक यांना अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, 1665 ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागिने (पान, मुकूट, मणी, नेकलेस, कंबर पट्टा, चैन, नथी, मुर्ती, पादुका, छत्री, पंचारती इ.), 3 मोबाईल आणि एक फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
08 मार्च रोजी रात्री श्री.महालक्ष्मीमाता मंदीर, काकडवाडी, ता.संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलुप तोडुन देवीच्या मुर्तीचे चांदीचे टोप, चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मुतींचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र व इतर सोन्याचे दागीने 24,94,000 रुपये किमतीचे दागिने चोरुन नेले असल्याचा गुन्हा संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस 331 (4), 305 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनाठिकाणी भेट देवुन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपध्दतीची माहिती घेवुन स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात व पोलीस अंमलदार सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी पथकास आवश्यक सूचना देवुन रवाना केले.
पथकाने गुन्हयाचे तपासात घटनाठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करू सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे, रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी त्याचा साथीदार सचिन मंडलीक याचे मध्यस्थीने गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळे रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार एमएच-04-एचएफ-1661 मधुन संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जात असताना पोलिसांनी आरोपीसह सहा इसमांना सापळा रचून ताब्यात घेतले.
विराट-रोहित-जडेजाला होणार कोट्यवधींचे नुकसान तर गिल-जैस्वालला लागणार जॅकपॉट, कारण काय?
ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.