Download App

तारीख ठरली! माजी आमदार मुरकुटेंची पुन्हा नवी इनिंग ‘या’ दिवशी करणार शिंदे गटात प्रवेश

Bhanudas Murkute will join Eknath Shinde Shiv Sena : अहिल्यानगमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर (Ahilyanagar) सत्ताधारी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगमध्ये जोरदार वाढ झाली आहे. यातच माजी आमदार भानुदास मुरकुटे हे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. वय वर्षे 84 असलेले मुरकुटे यांनी यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे अस्तित्वच शिल्लक राहिले नाही. त्यांनतर आता पुन्हा एकदा मुरकुटे (Bhanudas Murkute) पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी करत तीन वेळा आमदार राहिलेले, माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे हे येत्या 7 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे श्रीरामपूरमधील राजकीय गणित बदलणार, हे मात्र निश्चित.

कोण आहेत भानुदास मुरकुटे?

माजी आमदार भानुदास मुरकुटे हे अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर अलीकडच्या काळात त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. आक्रमक शैलीसाठी ते ओळखले जातात. त्यांनी श्रीरामपूरच्या (Shrirampur) पाणीप्रश्नावरून, अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणावरून माजी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही जोरदार हल्लाबोल केला होता.

रायगडवर पोषक असणाऱ्या गोष्टीच राहणार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचा रायगडकरांना शब्द 

ठाकरे गटाला धक्का

संजय छल्लारे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यावर ठाकरे गटाकडून श्रीरामपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. पण, स्थानिक पातळीवरली कार्यपद्धतीतील मतभेद, राजकीय गुंतागुंतीमुळे या पार्श्वभूमीवर छल्लारे यांची नाराजी सतत अधोरेखित होत होती. अखेर त्यांनीही शिंदेच्या शिवसेनेत पुढचा राजकीय डाव खेळायचा निर्णय घेतला आहे. आगामी काळातील निवडणुका पाहता स्थानिक राजकारणात नवे विरोधक, नवी समीकरणं तयार होत असतानाच त्यांनी पुन्हा मुख्य प्रवाहाकडे मोर्चा वळवला.

मोठी बातमी! अभिनेता डिनो मोरीयाच्या घरी ईडीची छापेमारी

मुरकुटे हे शरद पवारांचे निकटवर्तीय

माजी आमदार राहिलेले भानुदास मुरकुटे हे श्रीरामपुरात लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून गेली काही वर्षे राजकारण करत आहेत. विशेष म्हणजे मुरकुटे हे स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. शरद पवार यांचे निष्ठावंत व निकटवर्तीय म्हणून त्यांची त्यावेळी ओळख होती. मात्र बदलत्या राजकारणात त्यांनी देखील वेगवगेळ्या भूमिका घेत इतर नेत्यांना पाठिंबा दिला होता. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेकडून दिवंगत बाळासाहेब विखे यांच्याविरूद्ध उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

 

follow us