रायगडवर पोषक असणाऱ्या गोष्टीच राहणार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचा रायगडकरांना शब्द 

रायगडवर पोषक असणाऱ्या गोष्टीच राहणार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचा रायगडकरांना शब्द 

Sambhajiraje Chhatrapati : किल्ले रायगडावर आज अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला आहे. राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त आज या शिवराज्याभिषेक (Shivarajyabhishek) सोहळ्यासाठी गडावर दाखल झाले आहे. पोषक असणाऱ्या गोष्टीच रायगडवर राहणार, हा माझा शब्द आहे. असं या सोहळ्यात बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले.

आज मला सरकारला सांगायचे आहे की, शिवाजी महाराजांचे विचार लहान मुलांमध्ये रुजवायचे असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज मुलांना युरोपियन हिस्ट्री, मुगल शाहीबद्दल सांगण्यात येतो मात्र तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल का लिहित नाही? सीबीसी, एचएससी असेल किंवा कॉलेज असतील यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल किती शिकवण्यात येते? या बोर्डाच्या पुस्तकात दोन पाने नसतात शिवाजी महाराजांबद्दल असं या सोहळ्यात बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

तसेच जर तुमच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल आस्था असेल तर शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सरसकट शिक्षणात सामील करा अशी मागणी देखील त्यांनी या सोहळ्यात बोलताना सरकारकडे केली आहे.

या सोहळ्यात पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आज नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. आपल्या सोईनुसार भाषणात, कार्यक्रमात, नाटकात आणि चित्रपटात शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो यांना शिस्त आणली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी या सोहळ्यात बोलताना सरकारकडे केली.

रेपो दरात कपात, सर्वसामान्य माणसांना फायदा काय? जाणून घ्या सर्वकाही

पोषक असणाऱ्या गोष्टीच रायगडावर राहणार

याच बरोबर या सोहळ्यात बोलताना हा शिवराज्याभिषेक सोहळा आनंदाचा असून सुवर्णक्षण आहे. माझी जबाबदारी आहे की जे रायगडला पोषक आहे त्याच गोष्टी येथे राहणार, हा माझा शब्द आहे. अतिक्रमण काढत असताना माझं संरक्षण सुद्धा येथील धनगर समाजासाठी असणार आहे. ज्या ठिकाणी हजार दोन हजार लोक यायचे तिथं आज लाखो लोक येतात. एवढा शिस्तबद्ध शिवभक्त.. कोणताही कायदा हातात न घेणारा हा शिवभक्त आहे. असं देखील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube