राज ठाकरेंसाठी चर्चेची दारं खुली आहेत का? संभाजीराजे छत्रपती म्हणाले, अजेंडा सारखाच पण…,
Chhatrapati Sambhaji Raje Exclusive Interview : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (assembly election) जोरदार धूम पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच तिसऱ्या आघाडीने डोकं वर काढलंय. या तिसऱ्या आघाडीचं नाव परिवर्तन महाशक्ती आहे. या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची महत्वाची भूमिका आहे. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा केलीय. यावेळी लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संभाजीराजेंसोबत संवाद साधत अनेक प्रश्नांचा उलगडा केलाय.
छत्रपती संभाजीराजे यांच्या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांचा देखील समावेश आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना राज ठाकरेंसाठी (Raj Thackeray) चर्चेची दारं खुली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना संभाजीराजेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत का? या प्रश्नावर बोलताना, ते म्हणाले की, परंतु जे कोणी असं घडवून आणेल त्याचं धाडस आहे.
समुद्रात ताफा नेत थेट PM मोदींना जाब विचारला; संभाजीराजेंनी पुन्हा शिवस्मारकाचा मुद्दा छेडला
राज ठाकरे यांचा आणि माझा गडकोट किल्ल्यांसाठी अजेंडा सारखाच आहे. परंतु राजकारणात वेगवेगळी समीकरणं असतात, ते सगळे समीकरणं जुळवून आणनं आणि टिकवणं ही साधी गोष्ट नाही. ते जास्त स्पष्ट बोलतात, मी सगळ्यांना घेवून बोलतो. हाच फरक असल्याचं छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यासाठी एकमूठ बांधली असल्याचं संभाजीराजे म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांना शरद पवारांचा पाठिंबा नव्हता. त्यांना कोणीही मॅनेज करू शकत नाही, असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. मी छत्रपती शिवशंभूंचा वंशज आहे. शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. राजर्षी शाहू महाराज यांचं संपूर्ण आयुष्य आपल्या लोकांना मोठं करण्यात गेलंय. माझी देखील तीच भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर समाजाचा विश्वास आहे. त्यांना मोठं करताना पाठिंबा देण्याची जबाबदारी माझी आहे, असं विधान देखील संभाजीराजे यांनी केलंय.
मनोज जरांगे यांना शरद पवारांचा छुपा पाठिंबा? संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टच सांगितलं…,
मी राजर्षी शाहूंचा वंशज आहे. दसऱ्याचे विधी होतात, ते पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे होतात. पोशाख देखील पूर्वीपासून चालत आलेला आहे. शिवजयंती दिल्लीत साजरी केली हा अविस्मरणीय प्रसंग असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरवर्षी आता राजधानी दिल्लीत शिवजयंती साजरी होते. दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा मीच शाहुंची जयंती साजरी केली, त्याचा आनंद आहे, असं ते म्हणाले होते. राजकारणात सक्रिय व्हायचं, असं निश्चित केलंय. जनतेचं कामं पू्र्वीपेक्षा जोमाने करायची. प्रत्येक पाऊल टाकताना राजकीय अॅंगलने टाकावा लागेल. गडकिल्ले सोडून राजकीयदृष्टीने काम करावी लागतील. त्यानंतर अडथळे पार करत जायचं. जनतेची कामांच्या दृष्टीने पुढील प्रवास करायचा, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.