मनोज जरांगे यांना शरद पवारांचा छुपा पाठिंबा? संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टच सांगितलं…,
Chhatrapati Sambhaji Raje Exclusive Interview : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत. अशातच परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी स्थापन केलीय. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी तिसऱ्या आघाडीत महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. लेट्सअप मराठीने संभाजीराजेंसोबत विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांचा उलगडा केलाय. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी संभाजीराजेंना ( Chhatrapati Sambhaji Raje) टेकओव्हर केलेलं नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले (Chhatrapati Sambhaji Raje Interview) की, माझं मन खूप मोठं आहे. मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी त्याचा प्रसार मी भरपूर केलाय. सगळ्यांना आपापली जागा आहे. मनोज जरांगे हे एक चळवळीतील नेते आहेत. पूर्वी देखील त्यांची आंदोलन सोडवायला मीच असायचो, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांना सर्वात जास्त मी भेटायलो गेलेलो आहे. एखाद्या समाजातील नेता मोठा होत असेल, तर दोन पावले मागे येण्याची धमक माझ्यात आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. माझ्यातला तो मोठेपणा आहे. मी मनोज जरांगे यांना फोन करून विचारलं की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? काहीही असो फक्त निवडणुकीत योग्य जायला पाहिजे. ते म्हणाले की, समाजाचा विचार घेवून ठरवू. हाच फरक माझ्या आणि इतरांत आहे, असं देखील संभाजीराजे म्हणाले आहेत. मी छत्रपती शिवशंभूंचा वंशज आहे, राजर्षी शाहू महाराजांचं संपूर्ण आयुष्य आपल्या लोकांना मोठं करण्यात खर्च केलंय. शाहु महाराजांचा आदर्श घेवूनच जर मनोज जरांगे पाटील समाजात मोठे होत असतील, समाज त्यांच्यावर विश्वास ठेवत असेल तर त्यांना सपोर्ट करण्याची जबाबदारी असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील मनोज जरांगे पाटील यांची भूमिका भाजपविरोधी होती. परंतु त्यांना शरद पवारांचा छूपा पाठिंबा नाही, फक्त हा एक सेट झालेला नरेटिव्ह आहे.
सस्पेन्स संपला! नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा शिलेदार ठरला ! काँग्रेस आमदाराचा भाऊच फोडला !
मनोज जरांगे हे एक मॅनेज न होणारे नेता आहेत. ते समाजाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे टिकले आहे. आरक्षणाच्या माध्यमातुन ज्या गोष्टी सुटत नाही, त्या गोष्टी आपण तीन इन्स्टिट्युट सार्थी, बार्टीच्या माध्यमातून पोहोचवू शकतो. सरकारने वेगवेगळ्या जातींसाठी तयार केलेली महामंडळे फसवण्याच्या गोष्टी आहे. हे निवडणुकीच्या अगोदर का केलं नाही? असा सवाल त्यांनी केलाय. माझं काम प्रामाणिक आहे. रायगड प्राधिकरण स्थापन झालं तेव्हा फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं, तेव्हा तुम्ही अध्यक्षपद स्वीकारत असाल, तरच स्थापन करू अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे मी रायगड प्राधिकरणाची जबाबदारी स्वीकारली होती, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत. रायगडमध्ये राजकारण करणार नाही, तेथे उमेदवार करणार नाही ही भूमिका संभाजीराजे यांनी स्पष्ट केलीय.
रायगडबाबत उद्धव ठाकरेंनी देखील मदत केलीय. इतर गडकिल्ल्यांसंदर्भात कोणीही मदत केलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी देखील रायगडसंदर्भात मदत केली होती. श्रीकांत शिंदे हे माझे खास मित्र आहेत. त्यांनी मला न विचारता रायगडवर रोषनाई केली, त्यामुळं मी ट्विट केलं होतं. तसंच मालवण प्रकरण केवळ राजकीय फायदे घेण्यासाठी केलेलं आहे. प्रकरणानंतर आठ दिवसांतच पंतप्रधान मोदींना मी पत्र लिहिलेलं होतं. हा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने बसलेला नाही, असं 12 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. पंतप्रधान जेव्हा जलपूजन करण्यासाठी येतात तेव्हा, सगळ्या बाबी पू्र्ण झालेल्या असाव्यात. हे सगळ्या राजकीय पक्षांनी केलं पाहिजे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
‘राज्यात शंभर टक्के परिवर्तन होणार, समीकरणे जुळवणं सुरू…’, जरांगेंकडून सर्व पत्ते ओपन
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा हे मोठं आव्हानात्मक काम आहे. त्याबद्दल आजही मनात अनेक प्रश्नचिन्ह आहेत. कामाचं बजेट वाढत आहे, तेव्हा पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. विशाळगडावर गलिच्छपणा निर्माण झालाय. अतिरेकी तिथे आठदिवस राहिला. याच्यावर कोण बोलत नाही. मी फक्त अतिक्रमण काढा, असं बोललो आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. माझा लढा फक्त विशाळगडावरील अतिक्रमण काढणं हा होता. मी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदुत्व पाळत आहे. परंतु मी धर्मांद नाही, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत. परिवर्तन महाशक्तीसाठी मी पुढाकार घेतला होता. ते बच्चू कडूंना पटलं.
अजित पवार माझी सगळी सामाजिक कामं करतात. लोकसभा निवडणुकीत वडिलांमागे ठामपणे उभे राहिलो. भोसले नावं काढलेलं नाही, ही पूर्वीपासून परंपरा आहे. छ्त्रपती नावं लावल्यापासून आजपर्यंत परंपरा सुरू आहे. ही साडेतिनशे वर्षांपासून सुरू आहे. उदयनराजेंना अनेकदा भेटतो, असंही ते म्हणाले आहेत. राजघराण्यात जन्मलं असल्यामुळे जास्त आक्रमक भूमिका घेता येत नाही, लोकांना अनेक अपेक्षा असतात. राजेपण कुणाचंही राहिलेलं नाही, सर्वजण कर्तृत्वाने मोठे झालो आहेत. सगळे सारखेच आहेत, ही देण छत्रपती शिवाजीमहाराजांनी दिलीय. फुले आंबेडकर यांनी देखील हेच विचार दिले आहेत, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत. माझ्यापेक्षा माझा माणूस मोठा व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.