धीरज परदेशी प्रकरणात पोलीस अधीक्षकांचे मोठे विधान; म्हणाले आरोपींना…

Ahilyanagar Dheeraj Pardeshi case जे संशयित आहे त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुदर्शन  मुम्मका यांनी दिली.

Dheeraj Pardeshi Case

Dheeraj Pardeshi Case

Ahilyanagar Superintendent of Police makes a major statement regarding the Dheeraj Pardeshi case : अहिल्यानगर शहरातील धीरज परदेशी हत्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आले आहे सगळ्यात पहिले सहा जणांना अटक केली होती त्यानंतर तपासणीमध्ये आणखी दोघांना देखील अटक केली असून या प्रकरणाचा तपास हा सुरू आहे या प्रकरणी जे संशयित आहे त्यांच्यावर देखील तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन  मुम्मका यांनी दिली.

… तेव्हा नागपूरच्या दोन नेत्यांमुळे गोपीनाथ मुंडे करणार होते काँग्रेसमध्ये प्रवेश; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

श्रीरामपूर येथील सागर बेग यांच्यावरती एका महिलेने काही दिवसांपूर्वी आरोप केले होते मात्र तिने माघार घेतल्याचे बोलले जात आहे यावरती बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले संबंधित महिलेवरती कोणत्याही प्रकारचा पोलिसांचा दबाव नाही त्यांनी जे कथानक केले तेच आम्ही लिहून घेतले आहे त्या महिलेने जे तक्रार दिली त्यानुसार आमची कारवाई सुरू आहे त्यांची तक्रार नसेल तर त्यांनी तसं पोलीस कार्यालयात येऊन कळवावे असे देखील मुम्मका म्हणाले.

जरांगेंच्या प्रकृतीबाबत अपडेट; तपासणी अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार

धीरज परदेशी प्रकरणांमध्ये तब्बल आठ आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असून अधिकचा तपास सुरू आहे मात्र या घटनेतील कारण अद्याप समोर आलेलं नसल्याने यावरती बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले आमच्याकडून तपास सुरू आहे तपास कार्य पूर्ण झाल्यानंतर योग्य ती माहिती समोर येईल असे आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिले.

Exit mobile version