Ahmednagar Crime : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहर या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. त्यामध्ये काही दिवसांपूर्वीच शहरात धार्मिक दंगल उसळली होती. त्यानंतर आता पुन्हा दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेवगाव शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भातीचं वातावरण पसरलं आहे. (Ahmednagar Crime Shevgaon two dead and a injured in Robbers Attack )
Sharad Pawar : विरोधीपक्षाच्या बैठकीत देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून पुढची भूमिका ठरवणार
काय आहे ही घटना?
शेवगांव शहरामध्ये भर वस्तीत मारवाड गल्लीमधील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगा किशन बलदवा यांच्या राहत्या घरावर आज शुक्रवार 23 जून 2023 रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकला. यामध्ये त्यांनी केवळ ऐवजच लंपास केला नाही. तर त्यांनी या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Opposition Meeting : पाटणात आज विरोधीपक्ष एकवटणार; देशातील बडे नेते बैठकीला उपस्थित राहणार
यामध्ये गोपी किशन गंगा किशन बलदवा (वय 55 वर्षे) व त्यांच्या मोठ्या भाऊजाई पुष्पा हरिकिशन बलवा (वय 65 वर्षे) दोघांचा या दरोडे मध्ये मृत्यू झाला. त्याचबरोबर सुनिता गोपीकिशन बलदवा ह्या घटनेमध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळई सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
या घटनास्थळावर अहमदनगर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, परीक्षेतील आयपीएस अधिकारी बी रेड्डी, व शेवगाव ची पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावर व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. दरम्यान या घटनेनंतर शेवगाव शहरात असा प्रकारे दहशत निर्माण होत असल्याने आज शेवगाव बाजार पेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.