Opposition Meeting : पाटणात आज विरोधीपक्ष एकवटणार; देशातील बडे नेते बैठकीला उपस्थित राहणार

Opposition Meeting : पाटणात आज विरोधीपक्ष एकवटणार; देशातील बडे नेते बैठकीला उपस्थित राहणार

Opposition Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक होणार आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटणामध्ये होणार आहे. या बैठकीला देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता विरोधक काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Opposition Meeting in Patana against BJP )

Nana Patole : ‘महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा BJP चा कुटील डाव

या बैठकीला देशातील भाजपविरोधी 15 पक्ष उपस्थित राहणार आहेत. तर बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. तर या बैठकीला जेडीयू, आरजेडी. कॉंग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी त्याचबरोबर राज्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

Nana Patole : राज्यातील प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली पेटवल्या, महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपचा डाव

आजच्या या बैठकीमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी रणनिती आखण्यावर चर्चा होणार आहे. भाजपविरोधात देशातील विरोधीपक्षाची मूठ बांधण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या अगोदर देखील बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या त्यानंतर त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. ते केंद्रातील भाजप सरकार विरोधात समविचारी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोण-कोणते नेते उपस्थित राहणार?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक होणार आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटणामध्ये होणार आहे. या बैठकीला देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीता राम येचुरी, उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती, दीपांकर भट्टाचार्च हे उपस्थित राहणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube