Nana Patole : ‘महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा BJP चा कुटील डाव’

Nana Patole : ‘महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा BJP चा कुटील डाव’

Nana Patole : राज्यात मागील काही दिवसांपासून धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या अनेक घटना घडल्या. समनापूर, शेवगाव, अकोला या सारख्या अनेक शहरात दंगली झाल्या आहेत. कोल्हापूरमध्येही औरंगजेबचा फोटो स्टेट्सला ठेवल्यानं वातावरण चिघळलं होतं. या घटनांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांना एकमेकांवर आरोप केले होते. दरम्यान, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याच घटनांवरून सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला. भाजपने (BJP) महाराष्ट्राला मणिपूर (Manipur) करण्याचा घाट असल्याचा आरोप पटोलेंनी केला. (Nana patole said Riots to divert attention from the burning issue, BJP government’s cunning plan to make Manipur of Maharashtra)

पटोले यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं की, गेल्या अडीच महिन्यात महाराष्ट्रात 10 ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलींमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष असून, महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष हटववण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहेत. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूरला करण्याचा भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

Adipurush controversy: लेखकानंतर आता ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतला पोलिस संरक्षण 

ते म्हणाले, राज्यात अमरावती, अकोला, शेगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूरसह 10 ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजलेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची ही धूर्त चाल यशस्वी होऊ शकली नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातही भाजपने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण भाजपचे षडयंत्र जनता ओळखून आहे. त्यामुळे हा डावही फसला. राज्यातील जनतेने संयम बाळगला आणि सामाजिक सौहार्द हा येथील मुलधर्म असल्यानं अशा षडयंत्रांना, कारस्थानांना जनता बळी पडत नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत काँग्रेस पक्षाने पोलीस महासंचालक आणि राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र कारवाईबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत, असं पटोले म्हणाले.

महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्त्वाच्या समस्या उभ्या असताना भाजप सरकार त्यावर काहीच बोलत नाही. जनतेला दिलासा देणारे असे निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांवर आस्मानी, सुलताना संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकार फक्त मदतीच्या घोषणा करते पण सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी 1500 कोटींची मदत जाहीर केली. पण आधी जाहीर केलेली मदत गेली कुठे? ती शेतकऱ्यांना मिळालीच नाही. हे सर्व प्रश्न असल्याने सरकार त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असं पटोले म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube