Download App

Ahmednagar News : हेरंब कुलकर्णींवर हल्ला; आमदार जगतापांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील (Ahmednagar News) सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही समाजकंटकांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची आमदार संग्राम जगताप यांनी विचारपूस केली. यावेळी मा.जि.प.अध्यक्ष शालिनी विखे पाटील याही उपस्थित होत्या.

ट्रोल, टीकेला राहुलने मोजलंच नाही, करुन दाखवलं…

या हल्ल्याचा निषेध करत आमदार जगताप म्हणाले, हा केवळ एका व्यक्तिवरील हल्ला नसून हा संपूर्ण शिक्षण क्षेत्रावरील भ्याड हल्ला आहे. संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करावी, तसेच तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद घेण्यासाठी टाळाटाळ करून उशीर करणाऱ्यांचा मी निषेध नोंदवत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

Vijay Wadettiwar : ‘ये पप्पू लीडर नहीं बन सकता’ राहुल गांधींबाबतच्या वक्तव्यावरून भाजपने वडेट्टीवारांना घेरलं

हेरंब कुलकर्णी यांनी सारडा विद्यालयाच्या परिसरातील गुटख्याच्या टपऱ्याचे अतिक्रमण काढावे अशा सूचना दिल्या होत्या. त्याचा राग मनात धरून अचानकपणे हेरंब कुलकर्णी यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ला होऊन ४८ तास उलटूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.सामाजिक चळवळीत राहून काम करणारे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आजची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात वळली आहे.

ज्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच ठिकाणी जर अवैध धंदे, गुटका विक्री होत असेल तर विद्यार्थी कसा घडला जाईल हा विचार मनात ठेवून हेरंब कुलकर्णी यांनी सारडा विद्यालय परिसरातील गुटख्याच्या टपऱ्या काढण्याची मागणी केली. त्याचा राग मनात धरून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यावर हल्ला होत असेल तर ही बाब गंभीर आहे. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी संबंधित आरोपींना जेरबंद केले असल्याचे सांगितले.

follow us