मुख्यमंत्री आता कारवाई करणार का पाठीशी घालणार? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

Vijay Wadettiwar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे डायरेक्टर असलेल्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने तब्बल 1800 कोटी

  • Written By: Published:
_Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे डायरेक्टर असलेल्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने तब्बल 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली महार वतनाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतली. सरकारच्या नावावर असलेली जमीन कशी काय खरेदी केली? यात घोटाळा झाला आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुलासाठी फाईल रॉकेटच्या वेगाने फिरली. अमेडिया कंपनीला आयटी पार्क आणि डेटा सेंटरसाठी सरकारच्या मालकीची जमीन मिळाली कशी? आणि अवघ्या काही तासात उद्योग संचालनालयाने यासाठी 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ पण केली? एकीकडे अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले देतात कर्जमाफी कशी करणार, कितीवेळा फुकट मिळणार? मग आता राज्याच्या तिजोरीचे नुकसान करून त्यांच्या मुलाला कसे काय टॅक्स माफ होतो? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

एकीकडे तिजोरीत खडखडाट आहे अस सरकार सांगते आणि दुसरीकडे असे जमिनीत घोटाळे करून महसूल बुडवला जातो.पुण्यात अशा जमिनीच्या व्यवहारातून एक लाख कोटींचा घोटाळा झाला आहे.असे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी पण करता येईल आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी भरघोस मदत देखील करता येईल अस वडेट्टीवर म्हणाले.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीचा व्यवहार रद्द करून याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी जी जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. पुण्यातील प्रकरण समोर आल्यावर आता मुख्यमंत्री कारवाई करणार का? पारदर्शक पद्धतीने कारभार करतो असं सांगणारे देवाभाऊ सत्ता टिकवण्यासाठी दुर्लक्ष करणार की कारवाई करणार असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरेंसोबत ‘आघाडी’ ला नकार ; मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम?

घोटाळा करून असा काही घोटाळा केला नाही अस पार्थ पवार आता वरून बोलतात. म्हणूनच या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अस वडेट्टीवार म्हणाले.

follow us