Ahmednagar News : अहमदनगर शहरातील भिंगार परिसरात एका शाळेच्या (School) दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले असुन त्या पाण्यावर डासांचा वावर होतं आहे. सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर शहरात जून महिन्यापासून शाळेची घंटा वाजली आहे. शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत पण चिखलाचा रस्ता येतोय आडवा. विद्यार्थंना रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते. दरवर्षी याच रस्त्याने शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात. हा रस्ता वर्दळीचा असुन तरी दुचाकी देखील शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करू शकत नाही कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही.
थोडा मुबलक रस्ता आणि त्यात वाहनधारकांना तसेच पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना खुप कसरत करत शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून चालताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.आम्ही शाळेत कसं जायचं? आम्हाला शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकवर्ग करत आहेत. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
MLC Election : काँग्रेसचे चार आमदार फुटणार?, दोघांनी रात्रीच कल्टी मारली…..
भिंगार शहरातील एका शाळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली दिसून येते आहे.रस्त्यावर खड्डे पडले असुन सध्याच्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले आहे.सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे.या चिखलातुन शाळेत जाताना विद्यार्थ्यांना मात्र कसरत करावी लागत आहे.