भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश होणार; संरक्षण विभागाने दिला हिरवा कंदील

भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश होणार; संरक्षण विभागाने दिला हिरवा कंदील

Bhingar Cantonment included in Ahmednagar municipal corporation : अहमदनगरमध्ये (Ahmednagar) भिंगार शहर अहमदनगर कॅन्टोन्मेंटचा (Bhingar Cantonment) समावेश महानगरपालिकेमध्ये (municipal corporation) लवकरच होणार आहे. कारण आता या समावेशाला संरक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.

Prabhas: प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ला पहिला पुरस्कार जाहीर; नाग अश्विनने फोटो शेअर करत दाखवली झलक

मागील वर्षापासून देशातील छावणी (Cantonment) परिषदांचे नजिकच्या नगरपालिका आणि महापालिकांकडे हस्तांतरणाचा विषय चर्चेत आहे. सैन्य तळ सोडून देशातील 14 आणि महाराष्ट्रातील 6 छावणी परिषदांच्या नागरी परिसराचे विनामूल्य हस्तांतरणास, केंद्र शासनाने अनुकूलता दर्शवली आहे. संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली 25 जून रोजी झालेल्या बैठकीत हानिर्णय घेण्यात आला.

नायडू यांचा उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा अनुभवसंपन्न प्रवास; पंतप्रधानांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन

याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. यात भिंगार शहर अहमदनगर कॅन्टोन्मेंटचाही समावेश आहे. यामध्ये छावणी परिषदांच्या हस्तांतरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. नागरी परिसराला मूलभूत सुविधा आणि नगरपालिका सेवा पुरविण्यासाठी नागरी मालमत्तेवरील मालकी हक्क राज्य सरकार किंवा नगरपालिकांना विनामूल्य हस्तांतरित केले जाणार आहेत. संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाचे उपसंचालक हेमंत यादव यांचे या संदर्भातील पत्र नगरच्या छावणी मंडळाला प्राप्त झाले आहे.

भिंगार छावणी परिषदेची 1879 मध्ये स्थापना झाली होती. आजवर 25 हजार लोक याठिकाणी वास्तव्यास आहे. मात्र कॅन्टोन्मेंट भाग हा लष्कराच्या अधिपत्याखाली येत असल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. बांधकाम असो, नागरी समस्या असो अशा अनेक अडचणी नागरिकांना येत होत्या. यामुळे भिंगारचा समावेश नगर महानगरपालिकेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube