MLC Election : काँग्रेसचे चार आमदार फुटणार?, दोघांनी रात्रीच कल्टी मारली…..
MLC Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उद्या (12 जुलै) मतदान पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या (MLC Election) 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 12 उमेदवार मैदानात असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. महायुती आणि ठाकरे गटाने आपल्या आमदारांना मुंबईतील 4 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं नाही.
यातच आज काँग्रेसची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसचा कोटा संपल्यानंतर उर्वरित मते ठाकरे गटाच्या उमेदवाराला देण्यात यावे, असं आवाहन काँग्रेस आमदारांना केला आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार या बैठकीला काँग्रेसचे दोन आमदार गैरहजर होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. माहितीनुसार झिशन सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकर या बैठकीला गैरहजर होते.
आमचे चार आमदार फुटणार
आज माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमचे चार आमदार फुटणार असल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकाचा बाप राष्ट्रवादीत गेला आहे. एका महिला आमदाराचा नवरा राष्ट्रवादीत आहे. एक टोपीवाला इकडे-तिकडे असतो. तर चौथा नांदेडवाला आहे, अशा शब्दात गोरंट्याल यांनी वर्णन केले आहे.
झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तर जितेश अंतापुकर हे भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जातात. भाजपने अशोक चव्हाण यांना काँग्रेसमधील काही मतांची तजबीज करायला सांगितले आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन आमदारांबाबत काँग्रेसची शंका आणि चिंता वाढली आहे.
काँग्रेस आमदार बैठकीला उपस्थित
केसी पाडवी
सुभाष धोटे
कैलास गोरंट्याल
विश्वजीत कदम
शिरीष चौधरी
विजय वड्डेटिवार
नाना पटोले
पृथ्वीराज चव्हाण
धीरज देशमुख
अमित देशमुख
रवींद्र धंगेकर
संग्राम थोपटें
अस्लम शेख
अमीन पटेल
बाळासाहेब थोरात
रंजित कांबळे
कुणाल पाटील
नितीन राऊत
सुलभा खोडके
मोहन हंबीरडे
हिरामण खोसकर
राजेश एकाडे
अमित झनक
मारुती करोटे
माधवराव जवळकर
सुरेश वडपूरकर
लहू कानडे
चंद्रकांत जाधव
पत्नी राजू
आवळे विक्रम
सावंत ऋतुराज
पाटील स्वरूप
नाईक विकास
पक्षाला कळवून गैरहजर
संजय जगताप
यशोमती ठाकूर
Rajnath Singh : मोठी बातमी! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तब्येत बिघडली, AIIMS मध्ये दाखल
अनुपस्थित आमदार
झिशन सिद्दीकी
जितेश अंतापूरकर