Download App

Ahmednagar News : मारुतीची पूजा करत जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Ahmednagar News: प्रभू श्रीरामांबाबत (Ram) वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवतीच्या (NCP) (अजित पवार गट) वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरात दहण करण्यात आले. तर जोरदार निदर्शने करुन आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत समाजात फुट पाडण्यासाठी बेताल वक्तव्य जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान या प्रकरणावरून राष्ट्रवादीने आक्रमक होत आव्हाडांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली सावेडी येथील प्रोफेसर चौकात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस काळे फासून निषेध नोंदविण्यात आला. तर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करुन सर्जेपूरा चौकात आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. प्रभू रामाबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करुन त्याला अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं

आव्हाड यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे. प्रभू श्रीराम कोणत्या ठराविक समाजाचे नसून, ते समस्त हिंदुस्तानचे आहे. देवतांना राजकारणासाठी वाटून घेऊ नये, महायुतीचे सरकार महाराष्ट्रात एकोपा निर्माण करुन कल्याणकारी सरकार चालवत आहे. मात्र समाजाचे वातावरण दूषित करण्यासाठी आव्हाड वारंवार बेताल वक्तव्य करत आहे. प्रभू श्रीरामांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याने समस्त हिंदूच्या भावना दुखावण्यात आले असल्याचे भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते किरण घुले म्हणाले की, राजकारणासाठी देवाची वाटणी करणे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असमानता पसरविण्याच्या उद्देशाने आव्हाड यांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केले आहे. त्यांना हिंदू बांधव धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

follow us