Download App

Ahmednagar : अखेर ‘अहिल्यानगर’वर शिक्कामोर्तब! अहमदनगरच्या नामांतराला केंद्राची मंजुरी…

अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीयं.

Ahmednagar District Change Of Name : अखेर अहमदनगरचं (Ahmednagar) नाव ‘अहिल्यानगर’(Ahilyanagar) झालं असल्याची माहिती समोर आलीयं. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीयं. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे.

अहमदनगर जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे नाव देण्‍याची मागणी अनेक दिवसांपासून होती. नागरिकांच्या या मागणीनंतर महायुती सरकारने नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार केला. नगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते. केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी केले आहे. अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वे स्टेशन देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी कोणता प्रस्ताव दिला? तुतारी हाती घेताच पाटील म्हणाले, आता..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दर्शवला होता. आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच, असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सागितलं होतं.

कोपरगाव मतदार संघातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, विज वाहिन्या स्थलांतरणासाठी पाऊण कोटी- आ. आशुतोष काळे

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शासन दरबारी केली होती. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांकडूनही शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत होता. एवढंच नाहीतर अहमदनगरचे नाव अहिल्यानगर व्हावे यासाठी यात्राही काढण्यात आली होती. अहमदनगरच्या नामांतरावरुन विविध समाजांकडूनही मागण्यात करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं.

दरम्यान, काही वर्षांपूर्वीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर नामांतर व्हावे, अशी मागणी जोर धरु लागली होती. तर दुसरकीकडे अखिल भारतीय समता परिषदेकडून महात्मा फुलेनगर, जैन समाजाकडून आनंदनगर अशी नावे सूचवण्यात आली होती. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनीच आमदार राम शिंदे यांनी मागणी केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केलं होतं.

follow us