Download App

पुणे-अहमदनगरसह देशातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

Cantonment Board Elections : देशभरातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचा (Cantonment Board Elections) कार्यक्रम रक्षा मंत्रालयाने अखेर जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे (Pune), खडकी, अहमदनगर, औरंगाबाद आणि देवळाली कँटोन्मेंट बोर्डांचा (Ahmednagar Cantonment Board) समावेश आहे. बोर्डासाठी ३० एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कँटोन्मेंट बोर्डात निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे.

याआधी दोन वेळा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.त्यामुळे निवडणुका कधी होणार याबाबत चर्चा सुरू होत्या. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी (दि.१७) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.या संदर्भात राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हे वाचा : Ahmednagar News : मनपा स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळेंचा राजीनामा; नव्या सदस्यांची नियुक्ती

यामध्ये पुणे,खडकी, औरंगाबाद,देवळाली, अहमदनगर (भिंगार) कँटोन्मेंट बोर्डासह आगरा, अहमदाबाद, अजमेर, इलाहाबाद, अल्मोडा, अमृतसर, अयोध्या, बबीना, बादामीबाग, बकलोह, बरेली, बैरकपूर, बेलगाम, कन्नूर, चकराता, क्लेमेंट डाऊन, दगशाई, डलहौजी, दानापूर, देहरादून,फतेहगढ, फिरोजपूर, जबलपूर, जालंधर, जलापहाड, जम्मू, झांसी, जतोग, कामठी, कानपूर, कसौली, लंढौर, लैंसडाऊन, लेबांग, लखनऊ, मथुरा, मेरठ, महू, मोरार, नैनीताल, नसीराबाद, रामगढ, रानीखेत, रुडकी, सागर, सिकंदराबाद, शाहजहांपूर, शिलाँग, सेंट थॉमस माउंट कम पल्लवरम, सुबाथू, वाराणसी आणि वेलिंग्टन या छावणी मंडळांचा समावेश आहे. दरम्यान, कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर झाल्याने या परिसरातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. निवडणुका कधीही जाहीर होतील याची शक्यता गृहीत धरून राजकीय पक्ष व सदस्यांनी आधीच मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यानंतर आता निवडणुकाच जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत वेगाने घडामोडी घडताना दिसतील.

 

Tags

follow us