आता जनआरोग्य योजनेवर एआय ठेवणार वॉच, अनेक गैरप्रकार उडकीस आणल्याचा मंत्र्यांचा दावा

AI monitor the public health scheme तील गैरप्रकार रोखण्यासाठी टीएमएस 2.0 ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

AI Monitor The Public Health Scheme

AI Monitor The Public Health Scheme

AI to now monitor the public health scheme; Minister claims it has uncovered numerous irregularities : महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनियमिततेवर तात्काळ कारवाई करणारे विशेष फ्लाइंग स्क्वॉड स्थापन करण्यात येणार असून, रुग्णांना कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत याची माहिती मोबाईलवरच मिळावी यासाठी रिअल-टाइम बेड उपलब्धता डॅशबोर्ड विकसित करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबतचा तपशील समोर

रुग्णालयांतील गैरप्रकार रोखण्यासाठी टीएमएस 2.0 ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून तिच्या माध्यमातून मालप्रॅक्टिस त्वरित शोधली जात आहे. एकाच रुग्णाच्या शस्त्रक्रियेचे वेगवेगळ्या ठिकाणी दाखविण्यात आलेले प्रकारही या प्रणालीमुळे उघडकीस आले असून संबंधित रुग्णालयांवर सुओ-मोटो कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया कमेंट्समध्ये शिवीगाळ करताय… सावधान! राज्यसरकार नवा कायदा आणण्यासाठी सकारात्मक

रुग्णालयांकडून अतिरिक्त बिलांची मागणी, पॅकेजचा भंग किंवा अन्य तक्रारी प्राप्त झाल्यास ऑनलाईन तसेच जिल्हा समन्वयक व सिव्हिल सर्जन यांच्या माध्यमातून चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल. अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांच्या बदल्याही करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

सर्पदंशावरील लस उपलब्ध

राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी जनजागृती, वेळेवर उपचार, अँटी स्नेक व्हेनमची उपलब्धता आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. मंत्री आबिटकर म्हणाले की, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अँटी स्नेक व्हेनमची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.

Pune Rain : मुंबईनंतर पुण्यात भररस्त्यात कोसळलं झाड; थोडक्यात बचावली तरुणी

तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामपंचायत स्तरापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्पदंशानंतर भीतीमुळेही अनेकदा गंभीर परिणाम होतात. त्यामुळे रुग्णांनी ‘गोल्डन अवर्स’मध्ये रुग्णालयात पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत व्यापक जनजागृती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version