Download App

जरांगे रोज पटली मारतात, त्यांनी संत तुकाराम महाराजांचाही अपमान केला; बारस्कर महाराजांचे गंभीर आरोप

  • Written By: Last Updated:

Ajay Maharaj Barskar on Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा आरक्ष (Maratha Reservation) जाहीर केल्यानंतर दुसरीकडे मराठा संघटनेत फूट पडल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या लढ्यातील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे महत्त्वाचे सहकारी असलेले अजय महाराज बारस्क (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे यांच्यावर अनेक आरोप केले. जरांगे हे रोज पलटी मारतात, अशी टीका करत त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचा आरोपही बारस्कर महाराजांनी केला. मी पाणी पाजायला गेलो असतांना त्यांनी संत-फिंत गेले खड्ड्यात असं वक्तव्य केल्याचंही बारस्कर महाराज म्हणाले.

जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मीटिंग, बारस्कर महाराजांचे जरांगेंवर गंभीर आरोप 

अजय बारस्कर यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय. जरांगे पाटलांवर त्यांनी सडेतोड टीका केली. ते म्हणाले, मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. मी त्यांच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे, मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी काम करत नाही. मी कीर्तन करतो. कीर्तन करण्यासाठीचेही मी पैसे घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात खदखद होती, ती व्यक्त करत आहे.मला गोळ्या घालून मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, मात्र, माझं काम सत्य सांगणं आहे.

सरकार निवडणुकांची वाट पाहते का? कांदा निर्यातबंदीवरून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा 

बारस्कर म्हणाले, माझे काम हे सत्य सांगणं आहे. जरांगेंनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला आहे, तो मी खपवून घेणार नाही. लोक जरांगे यांना पाणी प्या सांगत होते, तेव्हा मी त्यांना पाणी द्यायला गेलो होतो. मात्र, त्यावेळी त्यांना वाटलं की, माझ्या हातातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईल. म्हणून त्यांनी ते पाणी प्यायले नाहीत. संत फिंत गेले खड्यात असं ते म्हणाले. तिथून माझा वाद सुरू झाला.

जरांगे रोज पलटी मारतात
हा माझ्यावर आरोप करतो की, सरकार आणि भुजबळ यांचा माणूस आहे. माझा आणि कोणाचा संबंध नाही. आजपर्यंत त्याने स्वत: सरकारला आरक्षणाच्या संदर्भात एकही पत्र दिलेले नाही. रोज पलटी मारतो तो, सगळ्या मिटींग कॅमेऱ्यावर करतो, याला घोडा लावतो, त्याला घोडा लावतो म्हणतो.

ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी गेली अनेक वर्षे लढत आहे. मधल्या काळात, अंतरवली येथे घटना घडली आणि मी पुन्हा आंदोलन लढ्यात सहभागी झालोय. मी मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठीही अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच मीडियासमोर आलो नाही. जरांगे यांना मी पाटील म्हणणार नाही. कारण जरांगे यांच्याकडे पाटील पदासाठी काहीच नाही. ते हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहतात, असं बारस्कर महाराज म्हणाले.

 

जरांगे यांची मुलगी म्हणते की, माझ्या बापाच्या देव पाया पडेल. इतका अहंकार मुलांमध्येही आहे. सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? असा सवाल बारस्कर महाराजांनी केला.

 

follow us