गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागेल, असं वाटत होत पण तसं घडताना मात्र दिसत नाही.
उद्या मुंबई येथे मुंबई विभागीय समितीकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. उद्या दिवसवभर हा कार्यक्रम होणार आहे. स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच मोठ्या नेत्यांची नवे आहेत. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ या सर्व मोठ्या नेत्यांची नावे या पत्रिकेवर आहेत. पण अजित पवार यांचं नाव या पत्रिकेत नाही. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
प्रसिद्धी पत्रकात काय म्हटले आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, शुक्रवार, दिनांक २९ एप्रिल २०१३ रोजी सकाळी 9.00 वा ते सायंकाळी ६.०० वा. या वेळेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘ध्येय राष्ट्रवादीचे… मुंबई विकासाचे…’ या शिर्षकाखाली ‘कार्यकर्ता मार्गदर्शन शिवीर २०२३ वे आयोजन करण्यात येणार आहे.
फडणवीसांची सहानुभूती मेली आहे का; श्री सदस्यांच्या मृत्यूवरुन राऊत भडकले
सदर शिबीराचे उद्घाटन माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात येईल. त्याचबरोबर खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत व राजकीय वक्ते यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने हे शिबीर पुढे कार्यरत होईल.
या शिबीरासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २००० हून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षसंघटनात्मक पुनर्रचना तसेच आगामी मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकांसाठी करावयाची तयारी व मार्गदर्शन, हे या कार्यक्रमाचे प्रमुख मुद्दे असतील.
सध्या महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती, महिलांची असुरक्षितता, महागाई, बेरोजगारी, परराज्यात जाणारे उद्योग, महापुरुषांचा अवमान, वोट बँक मिळवण्याच्या नादात लोकांच्या जीवाची पर्वा न करणे, सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबईचे खरे रूप दडवणे, नागरी सुविधा प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष करणे अशा व इतर विविध मुद्द्यांवर या कार्यकर्ता मार्गदर्शन शिवीरामध्ये चर्चा व मार्गदर्शन केले जाईल.
तरी आपल्या माध्यमातून सदर कार्यकर्ता मार्गदर्शन शिवीरास प्रसिद्धी मिळणेसंदर्भात सहकार्य करावे व आपल्या संस्थेचा एक प्रतिनिधी कॅमेरामन सहीत या कार्यक्रमास पाठवावा, ही नम्र विनंती.
Sanjay Raut : अग्रलेखात चुकीचे लिहिले ते अजितदादांनी सिध्द करावं
चर्चाना काही अर्थ नाही
यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर बोलताना तटकरे म्हणाले की मुंबई विभागीय समितीकडून हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याला स्वतः शरद पवार येणार आहेत. त्यामुळे बाकी चर्चाना काही अर्थ नाही.
पण अजित पवार यांचे पुणे परिसरात काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्यामुळे त्यांचं या पत्रिकेत नाव नाही. यातील बाकी चर्चाना काही अर्थ नाही. असं सुनील तटकरे म्हणाले.
