फडणवीसांची सहानुभूती मेली आहे का; श्री सदस्यांच्या मृत्यूवरुन राऊत भडकले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 20T111807.881

Sanjay Raut On Shri Sadasya Death :  शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिथे जमलेल्या श्री सदस्यांच्या उष्माघाताने मृत्यू झाला. हा मृतांचा आकडा 20 पर्यंत पोहोचला आहे. त्यावरुन राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच श्री सदस्यांचा मृतांची संख्या ही 50 पेक्षा जास्त पोहोचली असून सरकार ही आकडेवारी लपवत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

Atiq-Ashraf च्या मारेकऱ्याची कबूली, हत्यारं देणाऱ्यांची सांगितली नावं

या कार्यक्रमासाठी श्रीवर्धन, रोहा, रायगड अशा अनेक भागांतून श्री सदस्य आले होते. आमच्या माहितीनुसार 50 लोक याठिकाणी दगावले आहेत. पण मिंधे सरकारचे लोक त्यांना भेटून ही माहिती लपवत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. या विषयावर चर्चेसाठी 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीला आमचा पाठिंबा आहे. राज्य या विषयावर चर्चेसाठी दोन दिवासाचे विशेष अधिवेशन बोलावलेच पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

मोठी बातमी ! ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले

यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्लाबोल केला. पालघर साधू हत्याकांडावर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्ष तांडव करत होता. डहाणूला त्यांनी जत्रेच स्वरु दिलं होतं.  तो आता का गप्प बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सहानुभूती मेली आहे का?. त्यांना मन आहे की नाही?, असा प्रश्न विचारत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पालघर हत्याकांडावर यांनी केलेले तांडव आम्ही कधीही विसरु शकत नाही. त्यामुळे या 50 लोकांच्या मृत्यूवर हे बोलणार आहेत की नाही, असे राऊत म्हणाले आहेत.

Tags

follow us