Jan Samman Yatra : महायुतीत सहभागी झाल्यानंतर वर्षभराने अजित पवार यावर बोलते झाले असल्याचं पाहायला मिळालं आहे. अजित पवारांना आपली चूक झाल्यांचा आता साक्षातकार व्हायला लागला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने ते जाहीर सभेत बोलत होते. अजित पवारांनी काका शरद पवारांचा हात सोडला अन् ते महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर काहींनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तर काहींनी विरोध केला.
आनंदाची बातमी! यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा; गणरायाचं जल्लोषात होतंय स्वागत..
अजित पवारांकडून कबुली
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यावर बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. ती माझी चूक मी मान्य केली आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
एक डाव स्वतःकडे
धर्माराव बाबाच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा ठरवलं आहे, अस बाबाने सांगितलं. ती आता बाबाच्या विरोधात उभी राहील म्हणतेय, पण हे शोभतं का? तुम्ही अशा गोष्टीत लक्ष देऊ नका. मी तिला सांगू इच्छितो की, वस्ताद सगळे डाव शिकवतो. पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो. तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये. म्हणून मी सांगतो, तुम्ही बाबाच्या मागे उभे राहा. त्यांना निवडून आणा, असं अजित पवार म्हणाले आहेत.
श्री गणरायाचं आज आगमन! राज्यात अनेक भागांत पावसाचा कडेलोट, वाचा, आजचा काय आहे अंदाज?
1 कोटी 60 लाख महिला
आम्ही चांगल्या योजना जनतेला दिल्या आहेत. आम्ही मुलींसाठी एक योजना आणली. मुलीला 18 वर्षाची झाल्यावर 1 लाख रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 60 लाख महिलांना 3 हजारचं वाटप केलं. ज्या राहिल्या त्यांनी सुद्धा अर्ज करावा. त्याची काल मर्यादा वाढविली आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.