Baramati Assembly Election : लोकसभा निवडणुकीत जशी राज्यभरात बारामतीची चर्चा सुरू होती तशीच आता बारामती विधानसभेच्यावेळीही सुरू असणार आहे असे संकेत आता मिळालयला लागले आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता अजित पवाराबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता बारामतीकरांच्या नावाने लिहिलेलं गब्बरचं पत्र व्हायरल होतंय.
सध्या सोशल मीडियावर ‘गब्बर’ या नावाने लिहिलेलं एक पत्र जोरात व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये बारामतीतील राजकीय वातावरणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रात बारामतीच्या नेत्यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा यावर सवाल उपस्थित करण्यात आलाय. गब्बरच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पत्रात नेमकं लिहिलंय काय?
या पत्रामध्ये लेखकाने बारामतीकरांनी साहेब, दादा, ताई यांच्यावर नेहमीच प्रेम केल्याचे आणि मतदान रूपी आशीर्वाद दिल्याचे नमूद केलंय. परंतु, सद्यस्थितीमध्ये बारामतीचे राजकीय वातावरण गढुळ झाल्याचं मत देखील लेखकाने व्यक्त केलंय. स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांना तडाखा देण्यासाठी दादांची बदनामी करून त्यांना राजकीय पायउतार करण्याचा डाव खेळला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पत्रामधून करण्यात आलाय.
शिंदेंना हव्यात 120 जागा, अजित पवार इतक्या जागांवर निवडणूक लढवणार, भाजप काय निर्णय घेणार?
पत्रातून केले गंभीर आरोप
पत्रात ‘गब्बर’ने वहिनींच्या पराभवाच्या संदर्भात देखील वक्तव्य केलंय. वहिनींच्या पराभवानंतर आता दादांनाही राजकीय शर्यतीतून बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा दावा पत्रात केलाय. यामध्ये काही स्थानिक नेत्यांचां देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी दादांच्या गळ्यातील ताईत होऊन आर्थिक ताकद आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. प्रचाराच्या नावाखाली जातीयवाद आणि पैसे वाटप केली. यामुळे फसवणूक झाली, असं देखील पत्रात म्हटलं गेलंय. या पत्रामुळे मात्र बारामतीत मोठी खळबळ उडालेली आहे.