Download App

Ajit Pawar यांची लगावबत्ती : भाजपला ८७ टक्के तर, शिंदे गटाला केवळ १३ टक्केच निधी!

मुंबई : महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये असताना आम्हाला निधीमध्ये डावलले जात आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाडून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आणले. मात्र, आता आपण काय पाहतोय तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) भाजपला (BJP) तब्बल ८७ टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटातील ४० आमदारांना केवळ १३ टक्केच निधी दिला जात आहे. मग तुम्ही एवढा द्राविडी प्राणायम का केला, असा प्रश्न पडत आहे. राज्यातील निधी वाटप पाहिले तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला डोक्याला हात लावण्या वाचून पर्याय राहिला नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडी काळातील निधी वाटप आणि आता भाजप-शिंदे गटातील निधी वाटपातील फरक जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडी काळातील निधी वाटपाबद्दल केवळ खोट्या वल्गना केल्या का, असा प्रश्न देखील एकनाथ शिंदे यांच्या गटातील ४० आमदारांना केला.

Hanuman Chalisa Recitation Case : सुनावणी पुन्हा तहकूब, राणा दाम्पत्याला दिलासा!

अजित पवार म्हणाले की, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प म्हणजे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या भाषेत झाले तर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असेच म्हणावे लागेल. कारण या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकरी अडचणीत असतानाही त्यांच्यासाठी या सरकारने काहीही केलेले नाही. राज्यात नुकत्याच झालेल्या आवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा, कांदा, सोयाबीन आणि इतरही पिकांची नासाडी झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणे गरजेचे असताना या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे पाहायला मिळच आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला ५७ टक्के, काँग्रेसला ३३ टक्के तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १६ टक्केच निधी दिल्याचा आरोप एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी केला होता. त्याचे सर्व खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडल्याचे सांगत अजित पवार यांनी आता एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांना प्रश्न विचारला आहे. भाजपच्या काळात आता मिळत असलेल्या निधीबद्दल कसे वाटत आहे, असे म्हणत टोला लगावला. आता मिळत असलेल्या निधीमुळे समाधानी आहात ना, असा चिमटा देखील अजित पवार यांनी शिंदे गटाला काढला.

follow us