Download App

पतंगरावांनी केलेलं टीकवं म्हणजे झालं, जयंतरावांचा सल्ला घे; अजितदादांचा विश्वजित कदमांना टोला

Ajit Pawar यांनी अर्थसंल्पावरील चर्चेला उत्तर देताना सभागृहात विश्वजीत कदम आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली

Ajit Pawar Criticize Vishwajeet Kadam for advice of Jayant Patil on heritage of Patangrao Kadam : सध्या राज्याच्या विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये विविध विषयांवरून चर्चा सुरू असताना अनेकदा जुगलबंदी देखील रंगल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये सर्वांनाच टोले लगावले. ज्यामध्ये डॉक्टर विश्वजीत कदम यांना जयंत पाटलांच नाव घेत टोलेवाजा सल्ला दिला आहे.

सभागृहात नेमकं काय झालं?

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सध्या विधिमंडळामध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितलं की, राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत आपण जास्त कर्ज काढलं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य 10 लाख 80 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढू शकतो. पण आपण नऊ लाख कोटींचा कर्ज काढले. जे की जयंत पाटील अर्थमंत्री असताना पेक्षा चांगलं आहे. या संदर्भात एक कागद देखील यावेळी अजित पवार यांनी जयंत पाटील तुम्हालाही देतो असं म्हटलं.

औरंगजेबच्या कबरीचा वाद चिघळला ! दगडफेक अन् जाळपोळ, नागपुरात दोन गटांत तुफान राडा…

याचवेळी त्यांनी अमित देशमुखसाहेब आणि कदमसाहेब तुम्ही दोघेही फार हुशार माणसे या सभागृहात आहात. असेही म्हटलं. त्यावर विश्वजीत कदम म्हणाले, आम्ही ऐकतोय आणि शिकतोय. त्यावर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत म्हटलं की, नाही, तू ऐकतोय पण भारतीय विद्यापीठाचे सगळं पतंगरावांनी करून ठेवले. त्यामुळे तू नुसता ऐकतोय. तू काय केले? तू ते भारती विद्यापीठाचे कारभार नुसतं टिकवून दाखवं म्हणजे झालं आणि ते टिकवण्यासाठी जयंतरावांचा सल्ला घे कुठे काय कमी झालं तर…

‘एमपीएससी’च्या रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

यावर लगेचच विश्वजीत कदम यांनी अजित पवारांना उत्तर देताना म्हटलं की, भारती विद्यापीठाचं कार्यक्षेत्र मी वाढवतोय. मात्र त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, ते वाढलेलं अजून मला दाखवलं नाही. त्यामुळे आज सभागृहात विश्वजीत कदम आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचा पाहायला मिळालं.

follow us