औरंगजेबच्या कबरीचा वाद चिघळला ! दगडफेक अन् जाळपोळ, नागपुरात दोन गटांत तुफान राडा…

औरंगजेबच्या कबरीचा वाद चिघळला ! दगडफेक अन् जाळपोळ, नागपुरात दोन गटांत तुफान राडा…

Fight Between Two Groups In Nagpur Over Aurangzeb : नागपूरमधून (Nagpur) एक मोठी बातमी समोर आली आहे. सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा राडा झाल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे नागपूरमध्ये मोठं तणावाचं वातावरण ( Aurangzeb Tomb Controversy) आहे. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. एका गटाने घोषणाबाजी करताच परिसरातील दुसऱ्या गटाने देखील लगेच घोषणाबाजी सुरू केली होती.

घटनास्थळी प्रचंड तणावाचं वातावरण आहे. रस्त्यावर पोलीस गर्दी नियंत्रित करत आहे. त्यादिशेने जोरदार दगडफेक होत आहे. पोलीस तरूणांना थांबवत आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात (Nagpur News) आहे. अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली आहे. समोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत आहे. आक्रमक तरूणांनी वाहनांची जाळपोळ मोठ्या प्रमाणावर केली आहे.

खुशखबर! सोशल मीडिया इन्फ्लुएंसरवर पैशांचा पाऊस पडणार, सरकारकडून 1 अब्ज डॉलर्सच्या निधीची घोषणा

अजून देखील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगड फेकले जात आहेत, त्यामुळे हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी होती का? असा सवाल देखील उपस्थित होतोय. तर या राड्याची सुरूवात दुपारपासून झाल्याची माहिती मिळत आहे. ठिकठिकाणी आगी लावल्या जात आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झालाय. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आलेत. मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण आहे.

अहिल्यानगर हादरले ! बदनामीची धमकी देवून विवाहितेला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार

सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं होतं, यानंतर आता सायंकाळी दोन गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय. संतप्त जमावाने दगडफेक करत वाहनांची तोडफोड सुद्धा केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाल परिसरात सध्या तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube