Download App

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा; दंड थोपटत अजितदादांची सरकारकडे मोठी मागणी

मुंबई :  राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच आता शिंदे-फडणवीसांसोबत नव्याने संसार थाटलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar)सरकारकडे मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा अशी मागणी अजितदादांनी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतेच बिहारमध्ये (Bihar)करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक राज्यांतून अशाप्रकारची जातगणना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, भाजप अशा प्रकारच्या जनगणनेला फारसं इच्छूक नसून, नव्याने सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच अशाप्रकारची जनगणना करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ते माढ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Nitesh Rane : मराठा समाजाचा खरा ‘व्हिलन’ उद्धव ठाकरे; आरक्षणावरून नितेश राणेंचा घणाघात

अजितदादा म्हणाले की, राज्यात अजून एक मुद्दा चर्चेत आहे. तो म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण आणि धनगर समाजाचं आरक्षण. वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करण्याचा अधिकार कायद्याने, संविधानाने प्रत्येक समाजाला दिला आहे. आंदोलन करुन शकता, मोर्चे करु शकता, लोकांना जागृत करु शकता असेही यावेळी अजितदादा म्हणाले.

नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार का? बाळासाहेब थोरातांनीच दिले उत्तर

मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रात सुरुवातीच्या काळात झाली नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी डोकं वर काढायला लागली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सर्वांनी ठरवलं की, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्यायचं ठरवलं, असं एकूण 21 टक्के आरक्षण द्यायचा निर्णय झाला.

राज्यानं दिलेलं आरक्षण हाय कोर्टात, सुप्रिम कोर्टात टिकावं आणि सगळ्यांनी समाधानानं राहावं. जातीपातीमध्ये सलोखा राहावा, कुठंही दरी पडू नये, अशी भूमिका सरकारची असल्याचेही यावेळी अजितदादांनी स्पष्ट केले. आम्ही आरक्षण देण्याबद्दल सकारात्मक आहोत. त्याचबरोबर माझंही म्हणणं आहे की, एकदा जातनिहाय जनगनणा होऊच द्या.

नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय आहेत? किती आदिवासी आहेत, किती ओबीसी आहेत, किती ओपनमध्ये आहेत? हे पण आपल्याला कळलं पाहिजे. कारण साधारण त्या वर्गाच्या प्रमाणामध्ये आपण निधी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जातनिहाय जनगनणा झाली पाहिजे.

आम्ही बिहारच्या जनगणनेची माहिती माहिती मागवली आहे. बिहारमधील नितीश कुमार सरकारने कशी जनगनणा केली आहे? याची माहिती आम्ही मागवली आहे. त्याला काही हजार कोटी खर्च होतील पण एकदाचे चित्र स्पष्ट होईल. हे सगळं करत असताना मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. ते देत असताना इतर आरक्षणालाही कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यांच्याही भावना दुखावता कामा नये, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बिहार सरकारने जातनिहाय गणना केली आहे. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर केली आहे. बिहारमध्ये 13 कोटी लोकसंख्या आहे. यामध्ये सर्वाधिक हिंदू 81.9 टक्के आहेत. मुस्लिम 17.7 टक्के, ख्रिश्चन 0.05 टक्के, शिख 0.01 टक्के, बौद्ध 0.08 टक्के, जैन 0.0096 टक्के आणि अन्य धर्मीय 0.12 टक्के आहेत.

Tags

follow us