Ajit Pawar Beed : आमच्या विचारांचा बऱ्याच दिवसांपासून आम्हाला इथ माणूस मिळालेला नव्हता. मात्र, यावेळी विजयसिंह पंडीतच्या माध्यमातून आता आमच्या विचारांचा माणूस विजयी झाला आहे. (Beed) त्यामुळे आता तुम्हा नागरिकांची जबाबदारी संपली आहे.आता आमची जबाबदारी आहे असं म्हणत आम्ही गेवराईचा नक्कीच विकास करणार आहोत अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेवराईत नागरिकांना शब्द दिला आहे. ते गेवराईत आयोजीत सभेत बोलत होते.
बीड जिल्हा सामाजिक एकोप्याने राहणारा जिल्हा आहे. मात्र. गेल्या काही दिवसांपासून समाज विघातक प्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही बीड जिल्ह्याची चुकीची ओळख होऊ देणार नाहीत असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते.
आता अपेक्षा वाढल्या आहेत. लोकांच्या अपेक्षा माझ्याकडे आणि माझ्या अपेक्षा तुमच्या दादा तुमच्या कडे आहेत असे सांगून गेवराई बायपास ते बायपास सिमेंट रस्ता गेवराई शहराची हद्दवाढ, अचानकनगर येथील नागरिकांना घरकुल, गेवराई शहर स्वच्छ करण्यासाठी भुमिगत गटार, सिंदफनेचे पुनर्जिवन या व ईतर कामासाठी निधी मंजूर करुन द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी यावेळी विविध विकास कामाची माहीती दिली.
गेवराईच्या माजी नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश दाभाडे यांच्यासह सचिन मोटे, कृष्णा मुळे, मंजूर बागवान, विलास सुतार, विलास थोरात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.