Ajit Pawar : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) घोषणा होणार आहे मात्र त्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा दौरा करत आहे. आज बीड जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) येथे जनसन्मान यात्रा दाखल झाली . या यात्रेदरम्यान आयोजित एका सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेंतर्गत पुन्हा एकदा लाभार्थी महिलांना दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असल्याची घोषणा केली आहे.
यापूर्वी देखील सरकारने या प्रकारचा निर्णय घेत रक्षाबंधनाला महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा एकत्रित हफ्ता म्हणजेच 3000 रुपये जमा केले होते. तर आता पुन्हा एकदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबरच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करत आहे पण आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत. असं अजित पवार म्हणाले तसेच आम्ही माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली. या योजनेत तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही आणि केव्हाही काढू शकतात. जर आम्ही दिलेल्या योजना पुढील पाच वर्षे चालण्यासाठी घड्याळा चिन्हाला तुम्हाला मतदान करावे लागेल. असेही या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी बोलतो तसा वागतो हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही आणि तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हाच माझा वादा आहे असं अजित पवार म्हणाले.
सणासुदीत नवीन कार खरेदीचा विचार? 5 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करा ‘ह्या’ जबरदस्त कार्स
तसेच विधानसभेसाठी आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्यापैकी दहा टक्के जागा अल्पसंख्यांक समाजाला देणार असल्याची घोषणा देखील यावेळी अजित पवार यांनी केली.