Download App

अरे हो की बाबा झाली चूक, हा दिवटा असा…; घोडगंगावरून अजितदादांनी घेतला अशोक पवारांचा समाचार

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

शिरूर : अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदार अशोक पवारांचा समाचार घेतला आहे. ते शिरूरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर, नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू असेही अजित पवार म्हणाले आहेत. “तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. अशा शब्दांत अजितदादांनी अशोक पवारांची (Ashok Pawar) खिल्ली उडवली आहे. ते शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. (Ajit Pawar Attack On MLA Ashok Pawar Over GHodganag Shugar Factory)

नवनीत राणांना केवळ आमंत्रण पण, त्यांचा पक्षप्रवेश नाही; चर्चांना बावनकुळेंचा फुलस्टॉप

अजित पवार म्हणाले की, शिरूर विधानसभेचे आमदार अशोक पवारांनी घोडगंगा कारखान्यावर मुलाला चेअरमन केलं. त्यावेळी मी त्यांना तो नवखा असल्याचे सांगितले होते. पण, काही केल्या आमदार ऐकायला तयार नव्हते असे अजितदादा म्हणाले. पण त्यानंतर या कारखायन्याचं पुढे काय झाले हे आपण सर्वजण बघतच आहात. काराखाना बंद पडण्याची अवस्था निर्माण झाली आहे अशी सत्य परिस्थिती समोर आणत अशोक पवारांचा समाचार घेतला आहे. मी शेतकरी आहे. त्यामुळे पोल्ट्री, फळबाग, भाजीपाला अशा प्रकारची शेती मी करतो. वेळ मिळेल तेव्हा मी शेतात जातो. मात्र, कामाच्या व्यापाने मला तिथं जाता येत नाही. पण त्या अनुभवातून मला शेतकऱ्यांच्या समस्या समजलेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगत शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून लवकरच घोडगंगा कारखाना संकटातून बाहेर काढणार असल्याचा विश्वास अजितदादांनी शेतकऱ्यांना दिला आहे. यावेळी अजितदादांनी खासदार अमोल कोल्हेंचाही अजितदादांनी त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला.

घड्याळ बंद पडले की काय? अमोल कोल्हेंचा अजितदादा गटाला खोचक टोला

सेलिब्रेटी उमेदवारांवरून शिरूरमध्ये अजितदादांची जोरदार बॅटिंग!

अशोक चव्हाणांचा समाचार घेतल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलने खासदार अमोल कोल्हाेंनाही रडारवर घेतले. यावेळी त्यांनी नट नट्यांचे राजकारणात काय काम? असं म्हणत अमोल कोल्हे यांच्यासह देशभरातील सेलिब्रिटी उमेदवारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अशा सेलिब्रेटी आणि विशेषतः अमोल कोल्हे यांना पक्षात घेऊन, खासदार करून कशी चूक केली. याची कबूली दिली. आम्ही राजकारणी लोक एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रेटी काढतो. अशी कबुली देखील यावेळी अजित पवारांनी दिली.

Loksabha Election 2024: माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार ? पवार लेकीची जागा सेफ करणार

अमोल कोल्हे राजबिंडा चांगलं काम करेल म्हणून…

अमोल कोल्हेंचा समाचार घेताना अजितदादा म्हणाले की, अगोदर मीच तुमच्याकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांना मतदान करा म्हणून तुमच्याकडे विनंती करायला यायचो. त्यांना मी दुसऱ्या पक्षातून घरी नेऊन, पक्षात घेऊन, तिकीट देऊन, निवडून आणलं. मला वाटलं वत्कृत्व चांगलं आहे. दिसायला राजबिंडा आहे. चांगलं काम करतील. पण दोन वर्षानंतर ते म्हणायला लागले दादा मला राजीनामा द्यायचा आहे असे सांगितले. त्यावर मी म्हटले लोकांनी तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. असा मध्येच राजीनामा दिला तर, लोक जोड्याने मारतील आपल्याला. त्यावर कोल्हेंनी मी कलावंत आहे. माझे नाटक, चित्रपट, मालिका असतात. त्यावर परिणाम होत असल्याचे उत्तर दिले होते असे अजित पवार यांनी सांगितले.

follow us

वेब स्टोरीज