अजितदादांचा खास पठ्ठ्या शरद पवारांसोबत राहिला… जयंत पाटलांकडून अशोक पवारांचे तोंड भरून कौतुक
पुणे : “अशोक बापुंसारखे कार्यकर्ते व नेते सोबत असणे ही पवार साहेबांची ताकद आहे. सत्तेपुढे न झुकता पडेल ती किंमत देण्याची मानसिकता त्यांची आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते शिरूरमध्ये ‘विजय निश्चय मेळाव्या’त बोलत होते. (Nationalist Congress Party (Sharad Chandra Pawar) State President Jayant Patil praised Shirur MLA Ashok Pawar.)
यावेळी जयंत पाटील म्हणाले, आपण आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्यामागे उभे राहण्याचा निर्धार केला आहे, अशोक पवार यांच्यामागे तुम्ही सर्वांनी ताकद उभी केलेली आहे. शेवटी या जगात न्याय शिल्लक असतो, कधी कायमचा अन्याय होत नाही. अशोक पवार यांनी जी तडप व ठामपणा दाखवलेला आहे, ती किती ठामपणाने आदरणीय शरद पवार साहेबांच्यामागे उभे आहेत याचं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. आपल्या ठामपणाचे मी मनापासून कौतुक करतो, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’
जयंत पाटील पुढे म्हणाले, काल निवडणूक आयोगाने निर्णय काय दिला तर 2019 साली या पक्षामध्ये वाद होता. त्याचा परिणाम म्हणून नऊ जणांनी विरोधी बाजूला जाऊन शपथ घेतली. आमदार जास्त गेले म्हणून संपूर्ण पक्षच आता तिथे सरकवला. 2019 नंतर पुन्हा आपली सत्ता आली. मी आणि छगन भुजबळ यांनी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. त्यानंतर माझ्याच सहीने पवार साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची यादी मी उद्धव ठाकरे यांना दिली, मग उरलेल्यांनी शपथ घेतली.. याच्यात वाद कुठे आला?
राज्यसभेसाठी 9 नेत्यांची नावे दिल्लीत, पंकजा मुंडेंना संधी मिळणार का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
पक्षात मी गटनेता म्हणून होतो, पक्षाचा अध्यक्ष म्हणून होतो, माझ्याच सहीने पक्षातल्या सर्व आमदारांना एबी फॉर्म दिले. जर माझी निवडच योग्य नाही तर हे सगळे घरी गेले पाहिजेत की नाही? या देशामध्ये तारतम्य सोडून कारभार चालू आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जे आज आपल्या पक्षासोबत झाले ते इतर सर्व पक्षासोबत होऊ शकते. आपल्या देशातील लोकशाही संपू शकते याचा सामान्य माणसाने विचार केला पाहिजे. ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांनी या देशात काही अनर्थ चालू करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे किंवा आपोआप व्हायला लागले आहे. आपण जागरूकतेने सामान्य माणसाला अधिक जागरूक व डोळस केले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.