बिहारमध्ये 16 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, अजित पवार म्हणाले, न सांगता उमेदवार दिले अन्…

Bihar Election Result : बिहार विधानसभा निडणुकीचे निकाल जाहीर झाले असून 243 पैकी 202 जागांवर एनडीएने बाजी मारली आहे.

Bihar Election Result

Bihar Election Result

Bihar Election Result : बिहार विधानसभा निडणुकीचे निकाल जाहीर झाले असून 243 पैकी 202 जागांवर एनडीएने बाजी मारली आहे. तर महाआघाडीला फक्त 35 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर दुसरीकडे एमआयएमने 5 जागा जिंकल्या आहे. तर या निवडणुकीत महाष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील स्वबळावर निवडणूक लढवत 16 उमेदवार दिले होते मात्र सर्वच 16 उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाल्याने कुठलीही तयारी नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने बिहारमध्ये उमेदवार का? दिले याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात येत आहे मात्र अजित पवार यांनी या प्रश्नावर धक्कादायक माहिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललं तरी काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. बिहारमध्ये उमेदवार देण्यास मी सांगितले नव्हते अशी कबुली अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्याने बिहार निवडणुकीत अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले का? असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, बिहार निवडणुकीत (Bihar Election Result) उमेदवार उभे करु नका असं मी सांगितले होते मात्र त्यानंतरच्या काळात आमच्या इथं वरिष्ठ पातळीवर प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी काही निर्णय घेतले. मी तिथे जास्त लक्ष दिले नव्हते. मी महाराष्ट्रात होतो त्यामुळे मला त्याबाबत अधिकची माहिती नाही असं पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना न सांगता पक्षातील इतर नेत्यांनी उमेदवार दिले का? अशी चर्चा आता राज्यातील राजकारणात जोराने होताना दिसत आहे.

बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 16 जागांवर उमेदवार दिले होते मात्र सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. काही उमेदवारांना 21 तर काही उमेदवारांना 43 मते मिळाली. तर सासाराम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष सिंह यांना केवळ 112 मते मिळाली.

एनडीएची कामगिरी

तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वांना धक्का देत एनडीएने जबरदस्त कामगिरी केली. भाजपने 89 तर जेडीयूने 85 जागांवर विजय मिळवला आहे. याचबरोबर एनडीएमधील इतर घटक पक्षांनी देखील शानदार कामगिरी केल्याने एनडीएने 243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय मिळवला आहे.

मुंढवा जमीन प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मागणी

तर दुसरीकडे महाआघाडीला मोठा धक्का बसला असून त्यांना फक्त 35 जागांवर निडणुकीय यश मिळाले आणि एमआयएमने पुन्हा एकदा पाच जागांवर बाजी मारली.

Exit mobile version