Ajit Pawar on his statement on help of Flood victims : राज्यातील पावसानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव, बीड जिल्ह्यांत दौरा केला. यावेळी त्यांनी पैशांचं सोंग करता येत नाही. असं विधान केलं होतं त्यावर त्यांनी आता माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीडमध्ये त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये किंवा घरामध्ये देखील आपण सर्रास ही म्हण वापरतो की, सगळी सोंग करता येतात. पण पैशांचं सोंग आणती येत नाही.
मोठी बातमी! मोबाईल सबमिशनपासून मतमोजणीपर्यंत 30 बदल; निवडणूक आयोगाची नवी गाईडलाईन
ग्रामीण भागामध्ये अशी भाषा वापरली जाते. म्हणून त्यांना समजण्यासाठी मी हे विधान केलं. पण मी हे विधान वेगळ्या उद्देश्याने केलं. मात्र माझ्या या विधानाचा गैरवापर केला गेला. माध्यमांमध्ये मी त्या विधानाच्या अगोदर काय बोललो. नंतर काय बोललो ते दाखवलं जात नाही. त्यातून गैरसमज पसरवले जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या बेडरूमधील झाडं खरंच ऑक्सिजन देणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
दरम्यान अजित पवारांच्या या विधानावरून अजित पवारांसह सरकारला विरोधकांसह जनतेतून प्रचंड विरोध करण्यात आला. शेतकरी आणि तो देखील मराठवाड्यातील असल्यानेच अजित पवारांनी असं विधान केल्याचं बोललं गेलं. तसेच विरोधकांनी सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसल्याचं म्हणत टीकेची झोड उठवली. मात्र अखेर अजित पवारांनी त्यांच्या या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.