तुमच्या बेडरूमधील झाडं खरंच ऑक्सिजन देणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Indoor plants हवा स्वच्छ ठेवून श्वसनाचे आजार कमी होण्यास मदत करतात पण मग ही झाडं नकारात्मक कशी ठरतात? जाणून घेऊ सविस्तर...

Indoor plants in bedroom is it create oxygen what Expert Advice : आज 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिन आहे. या दिवशी तुम्हाला आरोग्याबाबत अनेक मोलाचे सल्ले दिले जातील. ज्यामध्ये हवा स्वच्छ ठेवणे, वायु प्रदुषण टाळणे यासाठी झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र जेव्हा तुम्ही ऑक्सिजनसाठी घरामध्ये लावले जाणारे झाडंच तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
‘तू मेरी पुरी कहानी’! महेश भटच्या कॅमेर्यामागे पूजा भटचं आत्मचरित्र? सत्य नेमकं काय…
दिल्लीसारख्या शहरांमध्ये निरोगी हवेसाठी नागरिकांकडून घरामध्ये विविध झाडं लावली जातात. जेणे करून हवा स्वच्छ राहील आणि श्वसनाचे आजार कमी होण्यास मदत होईल. यामध्ये तुळस, कोरफड, स्नेक प्लांट,एरिका पाम, स्पायडर प्लांट यांसारख्या झाडांचा समावेश आहे. ही झाडं भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतात. तसेचे ते औषधी गुणधर्मांसाठी देखील ओळखले जातात.
ट्रम्प यांचा आणखी एक झटका! औषधांवर लावला 100 टक्के टॅरिफ, भारताला मोठा फटका?
मग तुम्ही म्हणाल मग ही झाडं नकारात्मक कशी ठरतात. तर अनेक जण ही झाडं घराच्या अंगणात परिसरात लावण्याऐवजी बेडरूम्समध्ये लावतात. मग दिवसा जरी ही झाडं ऑक्सिजन सोडत असली तरी ती रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यामुळे झोपण्याच्या खोलीमध्ये अशाप्रकारे रात्री कार्बन डायऑक्साईड पसरल्याने आणखी आजार उद्धभवण्याची शक्यता आहे.
निर्लज्जपणाचा कळस! एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने हैराण, दुसरीकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न
दुसरीकडे काही तज्ज्ञ सांगतात की, बेडरूम्समध्ये झाडं लावणं तेवढं हानिकारक देखील नाही. कारण ही झाडं बाष्पीभवना दरम्यान ग्लुकोज देखील सोडतात. तर ते कार्बन डायऑक्साईड अत्यंत कमी प्रमाणात सोडतात. जे माणसाच्या एका श्वासाच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणाच्या देखील अनेक पटींनी कमी असतो. तरी देखील एका खोलीमध्ये 5 ते 6 पेक्षा जास्त झाडं नसावित जेणे करून त्यांची देखभाल आणि व्हेंटीलेशन देखील संतुलित राहिलं.