ट्रम्प यांचा आणखी एक झटका! औषधांवर लावला 100 टक्के टॅरिफ, भारताला मोठा फटका?
Donald Trump यांनी आणखी एक झटका दिला आहे. तो म्हणजे त्यांनी औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावला आहे. त्याचा भारतावर काय परिणाम होणार जाणून घेऊ...

Donald Trump 100 percent tariff on pharma Imports India May be hit : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लावलेल्या अतिरिक्त टॅरिफमुळे अनेक देशांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यात आता ट्रम्प यांनी आणखी एक झटका दिला आहे. तो म्हणजे त्यांनी औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावला आहे. त्याचा भारतावर काय परिणाम होणार जाणून घेऊ…
औषधांवर लावला 100 टक्के टॅरिफ!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी 25 सप्टेंबर रोजी ब्रॅंडेड पेटेंट औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लावण्यात आले आहेत. याचा भारताच्या औषध निर्मात्या कंपन्यांना देखील मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.
निर्लज्जपणाचा कळस! एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने हैराण, दुसरीकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न
याबाबत ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या प्लॅटफर्मवर माहिती दिली की, 1 ऑक्टोबरपासून फार्मास्युटीकल प्रोडक्ट्सवर 100 टक्के टॅरिफ लावला जात आहे. मात्र यामध्ये अमेरिकेमध्ये बनवल्या जाणाऱ्या औषध निर्मात्या कंपन्यांना यामध्ये सुट दिली जाणार आहे. औषधांबरोबर ट्रम्प यांनी किचन कॅबिनेटवर 50 टक्के, असबाबवाला फर्नीटरवर 30 टक्के, मोठ्या ट्रक्सवर 25 टक्के टॅरिफ लावला जात आहे.त्याचा फायदा अमेरिकन ट्रक निर्मात्या कंपन्यांना होणार आहे.
https://truthsocial.com/@realDonaldTrump/115267512131958759
भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिकेने ब्रॅंडेड पेटेंट औषधांवर लावलेल्या 100 टक्के टॅरिफचा परिणाम भारतीय औषध निर्मात्या कंपन्यांवर जास्त होणार आहे. 2024 मध्ये भारताने 31,626 कोटीहून अधिक औषधांची निर्यात ही अमेरिकेमध्ये केली आहे. तर 2025 मध्ये आतापर्यंत भारताने अमेरिकेला 32, 5050 कोटींची औषधं दिली आहेत.
Asia Cup 2025 : सलग तिसऱ्या रविवारी भारत-पाकिस्तान भिडणार! फायनलची थरारक लढत…
भारताच्या कमी किंमतीत मिळणाऱ्या जेनेरिक औषधांची अमेरिकेत जास्त मागणी आहे. डॉ. रेड्डी, सन फार्मा, ल्यूपिन आणि अरबिंदो यासारख्या कंपन्या अमेरिकेमध्ये व्यापार करून जास्त नफा कमावतात. मात्र ट्रम्प यांच्या फक्त ब्रॅंडेड पेटेंट औषधांवर लावलेल्या 100 टक्के टॅरिफमुळे हे स्पष्ट झालेलं नाही की, कॉम्प्लेक्स जेनरिक औषधांवर त्याचा किती परिणाम होणार? तर अगोदर अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. तर रशियाकडून तेल खरेदी केल्याने आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला गेलेला आहे.