निर्लज्जपणाचा कळस! एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने हैराण, दुसरीकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न
नागरिकांचे जीवन धोक्यात आहे, परंतु जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे संताप निर्माण झाला आहे.

Dharashiv Flood Farmers Crop Loss : धाराशिव जिल्ह्यात सलग मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. लाखो हेक्टर शेतीवरील पिके नष्ट झाली आहेत, घरं वाहून गेली आहेत. जनावरे मेली आहेत. अशा संकटात नागरिकांचे जीवन धोक्यात आहे, परंतु जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे संताप निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या वेदना दुर्लक्षित?
धाराशिव जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी (Dharashiv Flood) नागरिक पुरासारख्या संकटात असताना, तुळजापूरमध्ये आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीसह, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव आणि स्थानिक कलावंतांसह नृत्य केले. या प्रकाराचा (District Collector Keerthi Pujar) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, शेतकऱ्यांच्या वेदना (Farmers Crop Loss) दुर्लक्षित केल्याचे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी मात्र हा कार्यक्रम लोककलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केला असल्याचे मत व्यक्त केले आहे.
परिस्थिती अजून गंभीर
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लातूर व सोलापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भूम, वाशी आणि इतर पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नुकसान भरपाईचा अंदाज घेण्यात आला असून, मुसळधार पावसाची शक्यता असल्याने परिस्थिती अजून गंभीर राहण्याची शक्यता आहे.
लाखो हेक्टर शेतीचं नुकसान
मराठवाड्यातील नांदेड, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. काही गावांमध्ये पुराचा वेढा पडला असून, शेताला तलावाचं स्वरूप आलेला आहे. या अतिवृष्टीत 150 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला तर 8 जणांचा जीवही गेला. यंदा खरीप हंगामात 1200 हेक्टरच्या आसपास अतिवृष्टी झाली असून, लाखो हेक्टर शेतीवर मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे, अन्यथा अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीवर मात करणे कठीण होईल.