Download App

अंतर्गत प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचं कारण नाही; लाडकी बहिणच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी टोचले शिरसाटांचे कान

Ajit Pawar यांनी संजय शिरसाट यांनी देखील या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून निधी वळवला गेल्याचा दावा केला होता.त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Ajit Pawar on Sanjay Shirsat Cliam about Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Scheme : राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. त्यात नुकतच एप्रिल महिन्याचा लाभ देखील महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना आता यावरून राज्यसरकारमधील मंत्र्यांमध्ये तूतू मैमै सुरू झालं आहे. कारण मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून निधी वळवला गेल्याचा दावा केला होता.त्यावर आता स्वत: अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

लाडक बहिण योजनेच्या पैशांबाबत बोलताना अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत शिरसाटांना सल्ला देखील दिला. ते म्हणाले की, मी त्यावेळेसही मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती. आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः एससी, एसटीमध्ये त्या-त्या घटकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करतो. बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये निधी दिला जातो. विकासाच्या योजना देत असतो. लाडक्या बहिणीला निधी देत असताना ज्या लाडक्या बहिणी आदिवासींच्या घटकांमध्ये मोडल्या जातात. त्यांना सामाजिक न्याय विभागातून त्यांना निधी देण्यात आला आहे.

धक्कादायक! पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF जवान नोकरीतून बडतर्फ

तर बाकीच्या लाडक्या बहिणींना सर्वसाधारणमधून निधी देण्यात आला आहे. हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पामध्ये तो सादर करण्यात आला आहे. तसेच अर्थसंकल्प ज्यावेळी तयार होतो. त्यावेळेस त्यावर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यामध्ये एकनाथ शिंदे यांची देखील सही असते. असे स्पष्टीकरण यावेळी अजित पवार यांनी दिले.

CM फडणवीसांची कबुली, ‘त्या’ 72 तासात महायुती सरकारची मुहूर्तमेढ रोवली गेली

त्याचबरोबर शिरसाट यांना बोलताना अजित पवार म्हणाले की, संजय शिरसाट जे बोलले. तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी तो चव्हाट्यावर आणण्याचा काहीही कारण नाही. या विषयावर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय शिरसाट एकत्र बसून चर्चा करू. येत्या सहा तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळेस देखील तिथे यावर चर्चा केली जाऊ शकते. तसेच काही चूक झाली असल्यास ती दुरुस्तही केली जाईल. असं आश्वासन देखील अजित पवार यांनी शिरसाट यांना दिलं.

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

मंत्री संजय शिरसाट यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा लाडकी बहिण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, लाडकी बहिण लयोजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळता केला गेला आहे.अर्थ खात्यातून हे पैसे सर्रास वळते केले जात आहेत. त्यामुळे याची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

follow us