अजित पवार विमान अपघात प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत तपास करा, ममता बॅनर्जींची मोठी मागणी

Mamata Banerjee On Ajit Pawar :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले आहे.

Mamata Banerjee On Ajit Pawar

Mamata Banerjee On Ajit Pawar

Mamata Banerjee On Ajit Pawar :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संशय व्यक्त करत या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द करत या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी झाली पाहिजे. हे विनाकारण भीती पसरवणारे आहे की कट आहे, हे काळच सांगेल. सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायलटला दोष देणे, जसे आपण मागील दोन प्रकरणांमध्ये पाहिले असं माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या.

जर एखाद्या वरिष्ठ राजकीय नेत्यासोबत अशी घटना घडू शकते, तर ती आपल्या व्यवस्थेच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. मी असे अहवाल पाहिले की, एनडीएमध्ये असताना त्यांच्या राजकीय स्थानाचा विचार करत होते. अशा परिस्थितीत, या घटना खूप चिंताजनक आहेत. मला इतर एजन्सींवर विश्वास नाही. त्या पूर्णपणे तडजोड केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास झाला पाहिजे असं देखील ममता बॅनर्जी म्हणाल्या.

अपघात कसा घडला?

समोर आलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते मात्र विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने बारामती विमानतळापासून काही अंतरावर अजित पवार यांचा विमान क्रॅश झाला. विमान ज्या भागात कोसळले, तो भाग खोल होता आणि परिसरात झाडं झुडपं आणि उस शेती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यास अडचणी येत होत्या अशी देखील माहिती समोर आली आहे.

अजितदादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

उद्या सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘पिंपरी-चिंचवडचे’ शिल्पकार गेले; अजितदादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

विमानात कोण कोण होते ?

1. अजित पवार

2. विदीप जाधव

3. पिंकी माळी

4. कॅप्टन सुमित कपूर

5. कॅप्टन शांभवी पाठक

Exit mobile version