Download App

Ajit Pawar : ‘त्या’ भूखंडाची विचारपूस केली पण… अजितदादांनी फेटाळले बोरवणकरांचे आरोप

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरील पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आणले आहे. त्या आरोपांवर आता स्वतः अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी बोरवणकरांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

सुप्रीम कोर्टाने पुन्हा राहुल नार्वेकरांवर ताशेरे ओढले, 30 ऑक्टोबरला शेवटची संधी

काय म्हणाले अजित पवार?

गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझ्याबाबत माध्यमांमध्ये बातम्या सुरू आहेत. मात्र मी त्याला जास्त महत्त्व दिले नाही. कारण त्या गोष्टींची माझा काही संबंध नाही. मी गेली अनेक वर्ष पुण्याचा पालकमंत्री आहे. अनेक विकास कामांना गती देण्यासाठी आढावा बैठका घेतलेले आहेत. मात्र पालकमंत्री म्हणून आढावा घेतल्याने संबंधित मंत्र्यांचे अधिकार काढून घेतलेले नाही. मात्र एका रिटायर पोलीस ऑफिसरने पुस्तक लिहिले त्यात माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनंतर मी तत्कालीन सर्व कागदपत्र तपासले. त्यात त्या भूखंडाबद्दल मी काहीही केलं नव्हतं हे स्पष्ट होतं. तसेच या जागेबाबत मी आढावा बैठक घेतली होती. मात्र या बैठकीत कोणताही निर्णय बदलण्यात आला नव्हता. या भूखंडाबाबत समिती नेमण्यात आलेली होती.

National Film Awards: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘या’ दमदार कलाकारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

तसेच त्यावेळी बोरवणकर यांना देखील बैठकीत बोलावण्यात आले होते. त्यांनी संमती न दर्शवल्याने या जागेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे बोरवणकरांच्या आरोपाशी माझा काहीही संबंध नाही. येरवडा पोलीस स्टेशन परिसर विकास प्रकरण याबाबतचा निर्णय सरकारचा होता, माझा नव्हता. असं म्हणत यावेळी अजित पवारांनी बोरवणकरांचे आरोप फेटाळले आहेत. हे आरोप आताच का करण्यात आले आहेत? काही लोक पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी असे आरोप करतात. तसेच त्यात अनेक मुद्दे आहेत. मात्र माझाच मुद्दा का उचलून धरला गेला? असा सवालही यावेळी उपस्थित केला आहे.

बोरवणकरांनी काय आरोप केले होते?

पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले होते की, ते पुण्याचे पालक मंत्री असताना त्यांनी 2010 मध्ये येरवडा कारागृहाजवळील पोलीस दलाची तीन एकर जमीन बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी तत्कालिन पालकमंत्र्यांनी आग्रह धरला होता, मात्र आपण त्यास साफ नकार दिला, असा मोठा आरोप त्यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून केला आहे.

follow us