Ajit Pawar Speech in rain Baramati Criticize Opposition : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीसाठीची लगबग सुरू आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बारामतीमध्ये भर पावसामध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या वचन पुर्तीची उपस्थितांना आठवण करून दिली. ते राष्ट्रवादीच्या जनसामान्य मेळाव्यात बोलत होते.
‘मी फुटलेलो नाही, आधी माझी बदनामी थांबवा’ आमदार खोसकरांचा संताप
यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं ते म्हणाले की, लोकसभेमध्ये मिळालेल्या अपयशानेही खचून जाऊ नका. तसेच नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाने देखील हुरळून जाऊ नका. यावेळी अजित पवार बोलत असताना पावसाने हजेरी लावली. तर देखील भर पावसात अजित पवार यांनी आपल्या भाषण पूर्ण केलं.
Akshay Kumar च्या सरफिराची कामगिरी; दुसऱ्या दिवशी कमाईत 80 टक्के वाढ
तसेच अजित पवार म्हणाले की, परभणीच्या राजेश विटेकर यांना मी लोकसभेच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला सहा महिन्यात आमदार केल्याशिवाय राहणार नाही. ते वचन मी पूर्ण केला आहे कारण मी शब्दाचा पक्का आहे जो माझा वादा असतो तो पक्का असतो. तसेच यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा महिलांना कसा फायदा होणार आहे? हे देखील उपस्थित त्यांना सांगितलं.
त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये जनतेने महायुतीला निवडून द्याव जेणेकरून ही योजना पुढे कायम चालू राहील. हौसे नवशे आणि गवशे तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यावर विश्वास ठेवू नका. मी शब्दाचा पक्का आहे. विरोधकांकडून केवळ महिलांसाठी योजना आणल्याने टीका केली गेली. पुरुषांना काहीच दिलं नसल्याचं सांगितलं गेलं. मात्र आम्ही शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी केली आहे. इतर पिकांसाठी मदत म्हणून रक्कम दिली. असं म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं.