Download App

पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख केल्याने लोकसभेला फटका? अजित पवार म्हणाले मी तस कधी…

शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यानं त्याचा फटका बसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले आहे.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचार सभेत शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्या वक्तव्याचा निवडणुकीत फटका बसल्याचं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेटाळलं आहे. शरद पवारांवर बोलू नका अशी विनंती अजित पवारांनी मोदींना केल्याच्या चर्चांचा देखील त्यांनी इन्कार केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

Ajit Pawar: लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर आमचं बटन काय म्हणाले अजित पवार?

मी असं काही बोललो नाही. मी असं काही बोलल्याचा व्हिडीओ दाखवा. मागं देखील असच माझ्या नावावर खपवण्यात आलं की मी बहुरूपी बनून दिल्लीला जात होतो. मी त्यांना म्हणालो की सीसीटिव्ही व्हीडीओ दाखवा. पण त्यांनी पुरावा दिला नाही. आम्हाला राज्यांत फटका बसला कारण संविधान मुद्दा, अल्पसंख्याक बाजूला गेला त्याचा फटका बसला अशी कबुलीही अजित पवार यांनी यावेळी दिली.

अचानक एवढ्या योजनांना पैसा दिला कसा? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित आहे. राज्याचं स्थूल उत्पन्न 43 लाख कोटी रुपये आहे. या उत्पन्नावर आपण किती कर्ज काढू शकतो हे ठरतं. जे आता योजनांसाठी निधीची तरतूद केली ती आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार केली आहे. आम्ही घेतलेले निर्णय फार विचारपूर्वक घेतले आहेत. अर्थिक स्त्रोत वाढवण्याची देखील तयारी केली आहे. जीएसटी उत्पन्न 30 ते 40 हजार कोटीने वाढलं आहे. केंद्रातून देखील जास्तीत जास्त निधी आम्ही आणत आहोत असंही अजित पवार यावेली म्हणाले.

परमबीर सिंह यांनी अनील देशमुख, जयंत पाटील यांच्यावर आरोप केले आहेत या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मी माझं मन पक्क केलं आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुठलेही प्रश्न विचारले तरी मी विकासावर बोलणार आहे. मला अशा प्रश्ननांच्या खोलात जायचं नाही. कारण केवळ आरोप प्रत्यारोप होतात. फार काही त्यातून निघत नाही. त्यामुळे माझी याबाबत नो कॉमेंट्स असं म्हणत त्यांनी या विषयावर जास्त बोलण टाळलं आहे.

वसंतदादा पाटील यांच्यानंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता म्हणजे अजितदादा पवार; सुनिल तटकरे

राज्यसभेची जागाही राष्ट्रवादीच लढेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात आपला खासदार आहे, भाजपसाठी आपण जागा सोडली त्यामुळे आता राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढेल अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. अजित पवार म्हणाले, आम्ही लोकसभेला भाजपला सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आमचा त्या जिल्ह्यात खासदार आहे. घड्याळ चिन्हावर कायम खासदार आहे. आम्ही भाजपसाठी जागा सोडली. आम्हाला पियूष गोयल जागा देण्याचं कबूल केलं आहे. आम्ही ती जागा लढवणार आहोत असंही ते म्हणाले आहेत.

follow us