Ajit Pawar on Aurangzeb Tomb : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन राज्य केलं. तिच गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar) या सर्वांनी जातीय सलोखा राखण्याचं काम केलं. कारण नसताना ऐकमेकांच्याबद्दल गैरसमज निर्माण करणं मला पटत नाही.
त्या कबरीचे प्रकरण आत्ताच कशाला उकरुन काढायचं असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. ज्यावेळेस मंत्री म्हणून आपण काम करतो तेव्हा तारतम्य ठेवून बोललं पाहिजे असा नाव न घेता अजित पवारांनी नितेश राणे यांना टोला लगावला आहे. गेली अनेक दिवसांपासून नितेश राणे हे सातत्याने कबरीवरून बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला.
औरंगजेबाची कबर खोदायला तुमची मुलं पाठवा, गरीबांची नको; संसदेत राऊतांचा मोदी-शाहांवर जोरदार हल्ला
मी व्यवहारी माणूस आहे. आमचे 41 आमदार होते. भाजपचे 127 आमदार आले होते, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार हे त्रिवार सत्य आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या किती जवळ हे मला माहित असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं आपण वेळ न घालवता उपमुख्यमंत्री व्हावं असं मला वाटल्याचं अजित पवार म्हणाले.
प्रत्येक पक्ष निर्विवाद सरकार कसं येईल याचा प्रयत्न करणारच आहे. 1985 नंतर राज्यात कधीही एका पक्षाचं सरकार आलं नाही असं अजित पवार म्हणाले आहेत. सगळीकडील लोक वेगळा विचार करतात असे अजित पवार म्हणाले. मला वाटत नाही राज्यात कोणाचे एकाचे सरकार येईल, कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागते असे अजित पवार म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राणे?
आमच्या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आहे ती आठवण आम्हाला नकोच आहेत. आज प्रत्येक हिंदू अस्वस्थ आहे ज्याने महाराजांना हाल करून मारलं त्याची कबर महाराष्ट्रात नको. काहींना ती आठवण म्हणून वाटते पण ती घाण आम्हाला नकोय असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं होत. त्याचबरोबर त्यांनी यावरून अनेकदा असे वक्तव्य केले आहेत ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.