औरंगजेबाची कबर खोदायला तुमची मुलं पाठवा, गरीबांची नको; संसदेत राऊतांचा मोदी-शाहांवर जोरदार हल्ला

Sanjay Raut Criticize Modi and Shah on Aurangjeb Kabar in Parleament : राज्यात सध्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याची मागणी होत आहे. त्यावरून हिंदू- मुस्लिम वाद सुरू झाला आहे. यावरूनच नागपूरमध्ये (Nagpur) वाद (Aurangzeb Tomb) चिघळला. दोन गटांमध्ये मोठी दंगल देखील झाली. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संसदेत मोदी शहांसह भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला.
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या खटल्यात नवा ट्विस्ट; अग्निशमन विभागाने सांगितली ‘आतली’ बातमी
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, कालपर्यंत मणिपूर जळत होतं. मात्र आज महाराष्ट्र देखील जाळला आहे. नवीन मुडदे पाडण्यासाठी जुनी मढी उकरली जात आहेत. ते देखील औरंगजेबाच्या नावाखाली. ज्या नागपूर शहरांमध्ये गेल्या तीनशे वर्षांमध्ये कधीही दंगल झाली नाही. असा इतिहास असलेल्या शहरांमध्ये दंगल झाली. ती देखील राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ही दंगल झाली.
काँग्रेसमध्ये नक्की काय चाललय?, महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्या ८ तासात रद्द, कारण आलं समोर
त्यामुळे मी सांगू इच्छितो की, तुम्हाला जर औरंगजेबाची कबर हटवायची आहे. तर केंद्रातही तुमचं सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार आहे. त्यामुळे ती कबर नक्की हटवा. मात्र त्यासाठी तुमची मुलं पाठवा गरिबांच्या मुलांना ती कबर हटवण्याच्या प्रकरणामध्ये पाठवू नका. तुमची मुलं विदेशात शिकत आहेत. मात्र गरिबांच्या मुलांचं डोकं फिरवून तुम्ही त्यांच्याकडून अशा प्रकारची काम करून घेत आहात. असं म्हणत संजय राऊत यांनी संसदेत मोदी शहांसह भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला.
बेकार इज्जत काढलीं राव…..🤣🤣😂@rautsanjay61…….🔥🔥🔥🤟 pic.twitter.com/yYuvYQ4wxh
— महाविकास आघाडी (@mdontlod170021) March 21, 2025
नेमकी घटना काय?
नागपूरमधून (Nagpur) एक मोठी बातमी समोर आली होती. सोमवार 17 मार्च रोजी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा राडा झाल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे नागपूरमध्ये मोठं तणावाचं वातावरण ( Aurangzeb Tomb Controversy) आहे. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. एका गटाने घोषणाबाजी करताच परिसरातील दुसऱ्या गटाने देखील लगेच घोषणाबाजी सुरू केली होती.
घटनास्थळी प्रचंड तणावाचं वातावरण आहे. रस्त्यावर पोलीस गर्दी नियंत्रित करत आहे. त्यादिशेने जोरदार दगडफेक होत आहे. पोलीस तरूणांना थांबवत आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात (Nagpur News) आहे. अग्निशमन दलाची गाडी देखील घटनास्थळी पोहोचली आहे. समोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक होत आहे. आक्रमक तरूणांनी वाहनांची जाळपोळ मोठ्या प्रमाणावर केली आहे.