Ajit Pawar Stop covering up Munde, investigation into murder conspiracy must be conducted; Jarange demands from Fadnavis : मराठा समालाजा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी बीड जिल्ह्यात 2.5 कोटी रुपयांची डील झाली होती. असा धक्कादायक खुलासा झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु असून या डीलमागे बीड जिल्ह्यातील एक मोठा नेता होता. आरोप करत जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नावं घेतले आहे. त्यानंतर आता पुन्हा जरांगे यांनी अजित पवारांवर टीका करत फडणवीसांकडे यावर गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते. माझ्या घातपात कटप्रकरणात बीडचा कांचन साळवी आरोपी नसल्यास तो 4-5 दिवस फरार का होता? असा सवाल जरांगेंनी केला आहे. या कटप्रकरणी धनंजय मुंडेची चौकशी झाली पाहिजे, कारण हा कट त्यांनीच रचला आहे, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अजित पवार, तुम्ही धनंजय मुंडेवर पांघरूण घालणं थांबवा; अन्यथा 2029 ला मी तुम्हाला महागात पडेन, असा इशाराही दिला आहे. तसेच, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना चौकशीला पाठवावं, असं म्हणत धनंजय मुंडे, तुम्ही लपू नका; नार्को टेस्टसाठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
नेमकं प्रकरण काय?
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा आरोप होत आहे. (Jarange) या प्रकरणात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना पोलिसांनी दोन संशयितांना अटक केलं आहे. अमोल खुणे आणि दादा गरुड अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. अमोल खुणे हा बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावातील रहिवासी आहे.
