अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या विविध विधानांची दखल आणि चर्चा केली जाते. मात्र, स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी (Ajit Pawar) आज त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती कशी होती. बस्तान बसवण्यासाठी काय केलं? याबाबत अजित पवारांनी भाष्य करत घडलेली सर्व परिस्थिती सांगितली आहे. ते बारामतीतील आप्पा आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
Nana Patole ; अमृता आमची सुनबाई, देवेंद्र लहान भाऊ पण गृहमंत्री म्हणून…
अजित पवार म्हणाले की, माझ्या आयुष्याl अनेक घटना घटल्या त्या सांगितल्या तर खरं वाटणार नाही. पण या सर्व घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत. यावेळी त्यांनी त्याकाळात एक गाय साडे सात हजारांना विकत होतो तर एक एकर जमीन साडेसात हजारांना घेत होतो असा किस्सा सांगितला. माझ्या आयुष्यात असे अनेक किस्से असल्याचे सांगत मी दुधाच्या व्यावसायातून पुढे आल्याचे ते म्हणाले. याच व्यावसायामुळे माझं बस्तान बांधलं गेल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी आताच्या गायींना योग्य पोषण मिळत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. जुन्याकाळात शेतकरी पशुधनाची योग्य काळजी घेत होते. एवढेच नव्हे तर, गायींसाठी पंखे लावत असत. शेतीत कष्ट घेतले तर यश मिळते हे त्यावेळी कळलं असेही अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितले. आताच्या गायींना योग्य पोषण मिळत असल्याने दूध आणि शेण दोन्ही पुरक प्रमाणात मिळत होते असे ते म्हणाले. ज्या प्रमाणे अजित पवारांच्या इतर भाषणांची चर्चा होते त्याच प्रमाणे आज बारामतीत कार्यक्रमात त्यांनी सांगितलेल्या किश्याची चर्चा गावात रंगली होती.