Rohit Pawar on Ajit Pawar : महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा.डॉ. एनडी पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित होते.यावेळी त्यांनी अजित पवारांना टोले लगावले.
काय म्हणाले रोहित पवार?
या व्यासपीठावर अनेक दिग्गज नेते आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकारणातील मोठे-मोठे खेळाडू या व्यासपीठावर बासलेले आहेत. अजितदादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते यॉर्कर टाकणारे आहेत. त्यांच्या स्पीडची काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते. तर चंद्रकांतदादा कधी बॉलिंग कधी बॅंटिंग करतात. ते मिडीयम पेस बॉलर आहेत. पण बॉलिंग चांगली करतात. तर जयंत पाटील हे कधी ऑफ स्पिन, कधी लेग स्पिन तर कधी गुगली टाकतात. तर कधी बॉल हातातच ठेवून बॉलिंग केल्यासारखं भासवतात. त्यात आम्ही नवखे खेळाडू या दिग्गज खेळाडूंच्या बॉलला मारण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणत रोहित पवारांनी राजकीय फटकेबाजी केली.
“वाळवा तालुका वाकत नाही फंदफितुरी झाली तरी”, अजितदादांसमोरच जयंत पाटलांची मार्मिक टोलेबाजी
तर पुढे रोहित पवार म्हणाले की, काही वर्षांपुर्वी मी अधिवेशनात पहिल्यांदा भाषण केलं. तेव्हा मला अजित पवारांचा फोन आला मला त्यांनी सांगितलं की, भाषण चांगलं झालं पण तुझ्यावर सगळीकडून क्रमेरे असतात. जरा शर्टचे बटन लावत जा. तेव्हा त्यांचं माझ्यावर एवढं बारीक लक्ष होतं. पण आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला विसरले आहेत. ते अर्थमंत्री आहेत त्यांनी निधीसाठी लक्ष द्यावे.
अजितदादांसमोरच जयंत पाटलांची मार्मिक टोलेबाजी
मी व्यासपीठावरील दोन्ही दादांना (चंद्रकांत पाटील आणि अजितदादा) सांगू इच्छितो वाळवा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला स्वातंत्र्यसैनिकांची फार मोठी परंपरा आहे. ज्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही. हे या तालुक्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचे हे आयुष्याच्या अखेरपर्यंत एनडी पाटील सरांनी दाखवून दिलं. हाच या तालु्क्याचा आदर्श आहे.